आर्णी शहरात दंगा काबू योजना ची रंगीत तालीम घेऊन रूट मार्च*

*आर्णी शहरात दंगा काबू योजना ची रंगीत तालीम घेऊन रूट मार्च*
आर्णी गणेश एकंडवार आज दिनांक 6 सप्टेंबर 24 रोजी 4 वाजता पासून ते 6 वाजेपर्यंत आगामी गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद संबंधाने माननीय सहाय्यक पोलीस अधीक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी रजनीकांत चिलुमुल्ला साहेब दारव्हा यांच्या मार्गदर्शनात आर्णी शहरातील शिवनेरी चौक श्री महंत भारती विद्यालय येथील मैदानात दंगा काबू योजना रंगीत तालीम घेण्यात आली
तसेच आर्णी शहरातील गणेश उत्सव विसर्जन मार्गाची पाहणी करून शिवनेरी चौक, संकट मोचन हनुमान मंदिर चौक, रामराज्य चौक, बस स्टॅन्ड, नालापूल, माहूर चौक, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा, सोनार लाईन,गांधी गेट , गणपती मंदिर, बाकी पुरी मठ, जैन स्थानक, संवेदनशील वस्ती/मिश्र वस्ती प्रगट हनुमान मंदिर, पोलीस स्टेशन आर्णी परत असा रूट मार्च घेण्यात आला.
आयोजित दंगा काबू योजना रंगीत तालीम व रूट मार्च करिता आर्णी पोलीस स्टेशनचे ठाणेदार केशव ठाकरे पोलीस ठाणे आर्णीचे 4 अधिकारी व 25 अंमलदार तसेच 22 होमगार्ड याव्यतिरिक्त डिव्हिजन मधील 2 अधिकारी व 15 कर्मचारी असे एकूण 7 अधिकारी व 62 अंमलदार हजर होते. याशिवाय नगरपालिकेचे फायर ब्रिगेडचे 7 कर्मचारी फायर ब्रिगेड गाडी सह , ग्रामीण रुग्णालयाची ॲम्बुलन्स वरील एक कर्मचारी हजर होते. शिवाय पोलीस मित्रांची मदत घेण्यात आली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...