विहिंप चा षट्ठीपुर्ती स्थापना दिवस हर्षोल्लासात साजरा

*विहिंप चा षट्ठीपुर्ती स्थापना दिवस हर्षोल्लासात साजरा*
आर्णी गणेश एकंडवार आर्णी विश्व हिंदू परिषदेला साठ वर्षे पुर्ण झाल्या बद्दल षष्ठीपुर्ती स्थापना दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच संपन्न झाले ष्पुठिपुर्ती निमित्त शनिवार रोजी माहेर मंगल कार्यालय येथे विश्व हिंदु परीषद स्थापना दिवस एवं षष्टिपुर्ती वर्ष सोहळा आयोजित करण्यात आला होता. या ची सुरवात प्रभू श्रीरामचंद्र आणि भगवान श्री कृष्ण यांच्या प्रतिमेचे पूजन करुन व दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमाचे अध्यक्ष विष्णूभाऊ देवकर (वडार समाज संघटना विदर्भ प्रांत चे सचिव) प्रमुख अतिथी म्हणून विभाग संघचालक बंडुभाऊ उर्फ विजय कोषटवार
आशिर्वचना साठी भागवताचार्य शिव महापुरान कथा वाचक सुश्री शोभना दीदी नागपुर व ह भ प निलेश महाराज गावंडे, वीहिंप यवतमाळ विभाग सामाजिक समरसता प्रमुख मनीष बिसेन, आर्णी विहिंप प्रखंड अध्यक्ष राजेश माहेश्र्वरी हे मंचासिन होते, तर प्रमुख वक्ता यवतमाळ जिल्हा सामाजिक समरसता प्रमुख मिलींद पांडे हे होते. मिलिंद पांडे यांनी उपास्थित सर्व कार्यकर्ता एवं धर्मप्रेमी हिंदु महिला पुरुष नागरीकांना आजची परिस्थिती, विश्व हिंदु परीषद स्थापना एवं कार्याबद्दल महिती देऊन त्यांना देव देश धर्म कार्यामध्ये स्वतःला वाहून घेण्यासाठी प्रेरित केले.व सामाजिक समरसता जोपासत हिंदुत्वा साठी जागेव्हा संघटित व्हा चे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दुर्गा वाहिनी प्रखंड सह संयोजिका प्राजक्ता नखाते यांनी केले तर प्रस्ताविक नगर सह संयोजक यश वानखडे यांनी तर मान्यवरांचे परिचय नगर मंत्री शुभम सुखाडिया यांनी केले. वयक्तीक गीत प्रखंड संयोजिका राणी आडे व आभार प्रखंड मंत्री सुनिल ठाकूर यांनी केले. समाजा मध्ये धर्म एवं संस्कृति चे जागरण करणाऱ्या सर्व शाखीय भजनी मंडळाचा स्वागत मंचावरील उपस्थित मान्यवर एवं आर्णीतील धार्मिक क्षेत्रासाठी दानशूर व्यक्तीमत्व म्हणुन प्रसिद्ध असलेले राजेश श्रीवास व संपूर्ण वीहींप कार्यकर्त्यांचे हस्ते धर्मध्वजा देऊन सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे समारोप पसायदान एवं जयघोषाने करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...