उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स ने दिली धडक; २ ठार तर २ जण गंभीर जखमी
चौधरी पेट्रोल पंप जवळ उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स ने दिली मागून धडक
आर्णी गणेश एकंंडवार
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील आर्णी तालुक्यातील जवळा जवळील चौधरी पेट्रोल पंप जवळ नांदेड वरून बिलासपूर छत्तीसगडला उडीद घेऊन जाणाऱ्या ट्रक क्रमांक एम एच २६ बीई ८६१२ चा समोरचा टायर पंचर झाल्याने ट्रक ड्रायव्हरने ट्रक रस्त्याच्या बाजूला उभा करून टायर बदलवीत असताना, मागून नांदेड वरून प्रवासी घेऊन नागपूरला जाणारी अनुराग ट्रॅव्हल्स क्रमांक ४० बीजी ९९६६ ही ट्रॅव्हल्स भरधाव वेगाने येऊन उभ्या ट्रकला मागून धडक दिली. त्यामुळे दोन जणांचा मृत्यू झाला, असून दोन जण गंभीर जखमी आहे. मृत व्यक्तीमध्ये एक ट्रॅव्हल्स मधील प्रवासी असून एक ट्रकचा वाहक आहे. ट्रकचा वाहक हा ट्रकच्या खाली घुसून टायर बदलवीत होता. व अचानक ट्रॅव्हल्स ने धडक दिल्याने ट्रकचा टायर हा वाहकाच्या अंगावरून गेल्याने तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. कृष्णा उर्फ भगवान भुजंगा वाघमारे वय वर्ष 28 पलसी लोहा जिल्हा नांदेड असा असून दुसऱ्या मृतकाची अजून ओळख पटली नाही. सदर घटनेची माहिती आर्णी पोलिसांना मिळतात नाईटला कर्तव्यावर असलेले अरविंद जाधव, मुकुंद केंद्रे, सचिन पिसे, विशाल गावंडे यांनी तात्काळ घटनास्थळ घाटून जखमी प्रभाकर नामक ट्रॅव्हल्स चालक व वाहक रफिक हे गंभीर जखमी असून त्यांना ट्रॅव्हल्स मधून काढून त्यांना यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात उपचार करिता हलविले तसेच मृतक अनोळखी यांची बॉडी ही ट्रक आणि ट्रॅव्हल्स मध्ये फसून होती. रुग्णवाहिका चालक सिद्धू शिवा यांनी व पोलिसांनी मोठ्या कसरतीने बाहेर काढली. तसेच घटनास्थळाचा पंचनामा केला व पुढील तपास आर्णी पोलीस करीत आहे.
उभ्या ट्रकला ट्रॅव्हल्स ने दिली धडक; २ ठार तर २ जण गंभीर जखमी
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा