प्रथम व द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम अतिरिक्त प्रवेश फेरी
यवतमाळ, दि.3 : अभियांत्रिकी पदविका अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्ष व थेट द्वितीय वर्ष अभ्यासक्रमाच्या केंद्रभूत प्रवेश प्रक्रियेने तीन फेऱ्यानंतर रिक्त राहिलेल्या जागांसाठी प्रवेशाची अतिरिक्त फेरी घेण्यात येत आहे. प्रथम वर्षासाठी दि.5 सप्टेंबर तर द्वितीय वर्षासाठी दि.7 सप्टेंबर रोजी सकाळी 10 ते दुपारी 1 वाजता दरम्यान नोंदणी राहणार आहे.
प्रवेशप्रक्रियेसाठी संबंधित दिवशी www.dtemaharshtra.gov.in या संकेतस्थळावर CAP व Non-CAP ऑनलाईन नोंदणी केलेले विद्यार्थी प्रवेश फेरीसाठी पात्र समजण्यात येतील. प्रवेशासाठी उपरोक्त नमूद दिनांक व वेळेत संस्थेत प्रत्यक्ष हजर राहून अर्ज जमा करावा. त्यानुसार विद्यार्थ्यांची गुणवत्ता यादी तयार करण्यात येऊन त्याच दिवशी सूचना फलकावर प्रसिद्ध करण्यात येईल. त्या दिवशी दुपारी 1 वाजतानंतर येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार नाही.
सदर प्रवेश फेरीत नियमानुसार प्रवेशासाठी निवड झालेल्या विद्यार्थ्यांना त्याच दिवशी संस्थेत प्रवेश निश्चित करावा लागेल. प्रवेश फेरीकरिता प्रवेश घेण्यास इच्छुक विद्यार्थ्यांनी आवश्यक त्या मूळ कागदपत्रासह व विहित शुल्कासह सकाळी १०.३० वाजता प्रवेशाकरिता शासकीय तंत्रनिकेतन, यवतमाळ या संस्थेत हजर राहावे. रिक्त जागांची माहिती www.gpyavatmal.ac.in संस्थेच्या या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल.
नमूद प्रवेश फेरीनंतर जागा रिक्त राहिल्यास, झाल्यास प्रवेश प्रक्रियेसाठी वरील सूचनांप्रमाणे व त्याच वेळेनुसार दि. 9 व 10 सप्टेंबर रोजी प्रथम वर्ष पदविका व दि.13 सप्टेंबर रोजी द्वितीय वर्ष पदविका प्रवेशाची समुपदेशाने पुनःप्रवेश फेरी राबवण्यात येईल. अधिक माहितीसाठी प्रथम वर्षाकरता प्रा.भावना भगत 9421706622 व थेट द्वितीय वर्षाकरीता प्रा.व्ही.एस.येंडे 9503746496 यांच्याशी संपर्क करावा. या आधी इतरत्र प्रवेश घेतला असल्यास त्या विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतेवेळी Proforma N सादर करणे आवश्यक राहील, असे शासकीय तंत्रनिकेतनचे प्राचार्य आर.पी.मोगरे यांनी कळविले आहे.
प्रथम व द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी अभ्यासक्रम अतिरिक्त प्रवेश फेरी
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा