इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद
यवतमाळ, दि.3 सप्टेंबर 2024 इसापुर धरणाच्या मंजुर जलाशय प्रचालन आराखड्यानुसार दि.1 ते 15 सप्टेंबर या कालावधीमध्ये 75 टक्के विश्वास अहर्तेनुसार धरणाची पाणी पतळी 440.74 मीटर इतकी ठेवावयाची आहे. दि.2 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4 वाजता इसापुर धरणाची पाणी पातळी 439.40 मीटर इतकी असुन उपयुक्त पाणीसाठा 816.75 दलघमी इतका आहे. सद्यस्थितीत इसापुर धरणामध्ये येणारा पाण्याचा येवा कमी होत आहे. त्यामुळे धरणाची सर्व वक्रद्वारे बंद आहेत.
इसापुर धरणाच्या खालील बाजुस दि.1 सप्टेंबर रोजी अतिवृष्टी झाली असून त्यामुळे पेनगंगा व कयाधु नदीला पूर आला आहे. दि.2 सप्टेंबर रोजी दुपारी 12 वाजता राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 361 हदगाव - उमरखेड रोड वरील मालेगाव पुलावरुन पाणी जाण्यास सुरुवात झाली आहे व नदीने धोकापातळी ओलांडली आहे.
सदरची पूरस्थिती ही इसापूर धरणाच्या खालील बाजूस झालेल्या अतिवृष्टीमुळे निर्माण झालेली आहे. सद्यस्थितीत यावर्षी इसापुर धरणामधून अद्यापपर्यंत विसर्ग सोडण्यात आला नाही, त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नये, असे नांदेडच्या उर्ध्व पेनगंगा प्रकल्प विभाग क्रमांक एकच्या कार्यकारी अभियंता यांनी कळविले आहे.
इसापूर धरण सांडव्याची सर्व वक्रद्वारे बंद
Bhagirath Raja 24 News.com
0

टिप्पणी पोस्ट करा