⚡ ब्रेकिंग News

घुसखोरी रोखण्यासाठी केले रस्ता रोको आंदोलन

आदिवासिंकडून धनगर समाजाला विरोध
• घुसखोरी रोखण्यासाठी केले रस्ता रोको आंदोलन • तहसीलदारांच्या उपस्थित दिले मुख्यमंत्र्यांना दिले निवेदन आर्णी:- तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने,आदिवासी समाजातील धनगर समाजाची होणारी घुसखोरी थांबविण्यासह,विविध मागण्यासाठी आर्णी शहरानजीक असलेल्या,येरमे पेट्रोल पंप समोर सोमवार दि.३० सप्टेंबर रोजी १ वाजता दरम्यान रस्ता रोको आंदोलन केले. सध्या महाराष्ट्रात सुरु असलेल्या धनगर आदिवासी समाजाच्या आरक्षणाबाबत सुरु असलेला वाद सोडवण्यासाठी,मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी धनगर समाजाच्या पंढरपूर येथे सुरु असलेल्या उपोषणाला भेट दिली असता,धनगर समाजाला आदिवासींचे आरक्षण देण्यासंदर्भात आश्वासित केले,यामुळे आदिवासींच्या भावना दुखावल्या गेल्याने,धनगर आदिवासी आरक्षण वाद पेटला. दरम्यान आर्णी तालुक्यातील सकल आदिवासी समाजाच्या वतीने आर्णी शहरानजीक असलेल्या,येरमे पेट्रोल पंप समोर सोमवार दि.३० सप्टेंबर रोजी १ वाजता दरम्यान रस्ता रोको आंदोलन केले या आंदोलनात जवळपास १ तास आदिवासी बांधवानी आपल्या व्यथा मांडल्या,तर एक तास महामार्ग थांबल्याने,महामार्गाच्या दुतर्फा वाहणांच्या रांगा लागल्या होत्या. दरम्यान,महाराष्ट्रातील धनगर जात असून आदिवासी ही जमात असल्याने,धनगर समाज आदिवासीचे कोणतेही निकष पूर्ण करू शकत नाही,तरी महाराष्ट्रातील आदिवासी आरक्षणाच्या सुचितील ३६ नंबरची जमात ओरान धनगड असून,धनगर नाही तरि धनगर समाज धादांत खोटा बोलत असून,सरकारच्या डोळ्यात धूळ फेकत आहे.तरी धनगर जात ही आदिवासी नसून,आदिवासींचे आरक्षण व सवलत धनगरांना देऊ नये,धनगर समाजाच्या अभ्यासासाठी नेमण्यात आलेल्या टाटा या समाजशास्त्र संस्थेचा अहवाल जाहीर करावा,अधिसंख्य पदांमुळे रिक्त झालेल्या आदिवासींच्या १२५०० जागा तात्काळ भराव्या व आदिवासी पेसा १७ संवर्गातील भरती प्रक्रिया तातडीने राबवावी अशा आशयाचे निवेदन तहसीलदार आर्णी यांच्या मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.या आंदोलनावेळी आर्णी तालुक्यासह शेजारील तालुक्यातील कैलास वड्डे,तुळशीदास मोरकर,करण शेलकर, माजी आमदार राजूभाऊ तोडसाम, विष्णू उकंडेसह आदिवासी बांधव व महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या. कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी ठाणेदार केशव ठाकरे यांनी पोलिसांचा चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...