*तोतया पोलिसांनी युवकास दहा लाखांनी लुटले आर्णीतील दिग्रस रोडवरील घटना; आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल*
आर्णी गणेश एकंडवार
आर्णी पैशाच्या मोबदल्यात सोन्याची नाणी देतो, अशी बातावणी करून लातूरच्या युवकाला आर्णीत बोलावले. येथे आल्यानंतर आरोर्पीनी पोलिस असल्याचा बनाव करून युवकाचे तब्बल दहा लाख रुपये लुटले. हा प्रकार २५ सप्टेंबरच्या सायंकाळी दिग्रस रोडवर घडली.
महेश रामेश्वर हाके (वय २०) रा. चकूर जि. लातूर, असे रक्कम
लुटून नेलेल्या युवकाचे नाव आहे. या घटनेबाबत हाके यांनी २७ सप्टेंबरला आर्णी पोलिसात फिर्याद दिली. त्यारून, दिनेश सुभाष पवार (वय ४०) रा. आर्णी, गणेश गोपाळ चव्हाण (वय ३५), बापू (पूर्ण नाव माहिती नाही) व इतर पाच लोक अशा आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दिनेश सुभाष चव्हाण याने 'माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. त्यामुळे उपचाराकरिता पैसे पाहिजे. तुला माझ्याकडील सोन्याची नाणी देतो. त्या बदल्यात दहा लाख रुपये मला दे.' अशी बतावणी केली. त्यासाठी फिर्यादी महेश हाके याला पैसे घेऊन आर्णी येथील दिग्रस रोडवर बोलावले. व्यवहाराबाबत खात्री झाल्याने महेश हाके बॅगमध्ये दहा लाख रुपये घेऊन आले होते. ते आरोपींना दिले व त्यांच्याकडे सोन्याचे नाणे असलेली स्टीलची कॅटली घेतली. त्याचवेळी तेथे चार चाकी वाहन आले व त्यातून पाच व्यक्ती खाली उतरले. त्यातील तिघे पोलिसांच्या वेशात होते. त्यांनी नोटांचे बंडल बॅगसह ताब्यात घेतले.तसेच मारहाण केली. 'तुम्ही येथून लवकर जा, नाहीतर तुम्हालाही अटक करून घेऊन जाईल.' अशी धमकी दिली. आरोपींनी संगनमत करून पोलिस असल्याची बतावणी करून फसवणूक केल्याची फिर्याद महेश रामेश्वर हाके यांनी आर्णी पोलिस ठाण्यात दिली. त्यावरुन दिनेश सुभाष पवार, गणेश गोपाळ चव्हाण, बापू व इतर पाच लोक अशा आठ जणां विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ठाणेदार केशव ठाकरे यांच्या मार्गदर्शनात सागर दानडे तपास करीत आहेत.
तोतया पोलिसांनी युवकास दहा लाखांनी लुटले आर्णीतील दिग्रस रोडवरील घटना; आठ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल*
Bhagirath Raja 24 News.com
0

टिप्पणी पोस्ट करा