"त्या" ला मतदारसंघावर थोपवू नका अन्यथा पराभव पक्का ; काँग्रेस समर्थक मतदारांच्या भावना
आर्णी- केळापूर मतदारसंघातील उमेदवार पक्षश्रेष्ठीने पारखून द्यावा ?
आर्णी : आर्णी-केळापुर मतदारसंघात काँग्रेस पक्षाने स्थानिक व निष्ठावंत कार्यकर्त्याला उमेदवारी द्यावी अशी मागणी जनतेतून व कार्यकर्त्यातुन होत आहे.आर्णी केळापूर मतदारसंघ हा काँग्रेस पक्षाचा बालेकिल्ला मानला जातो या मतदारसंघाने काँग्रेसला निवडून दिले त्यात निवडून आलेल्या आमदारांना मंत्री पद ही मिळाले परंतु मंत्री पद असूनही पाहिजे तसा विकास या मतदारसंघाचा झाल्याचे दिसून येत नाही.त्यामुळे येथील जनता आता त्याच त्या उमेदवाराला कंटाळली असून स्थानिक नवीन चेहऱ्याला पसंती देत आहे.आता विधानसभा निवडणुक होणार आहे. त्यासाठी जे भावी उमेदवार गावात जाऊन समाज बांधवासह सामाजिक उपक्रम राबवून मतदार संघात लोकांचे मन जिंकण्याचा प्रयत्न करत आहेत त्यांना आर्णी केळापूर ( 80 ) विधानसभा मतदारसंघातील अनेक गावातून मतदार व कार्यकर्ते नापसंद करत आहे.प्रत्येक युवा कार्यकर्त्यांना स्थानिक कार्यकर्ता आमदार व्हावे असे वाटत आहे त्यामुळे याकडे पक्षश्रेष्ठीने लक्ष द्यावे व काँग्रेस बलाढ्य करण्यासाठी उमेदवार पारखून द्यावे अशी मागणी आर्णी केळापूर मतदारसंघातील जनता करत आहेत.
एकंदरीत यावरून अशी दिसते की कर्तुत्व शून्य अशा माजी मंत्र्याच्या पुत्राला यावेळी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांवर,मतदारांवर तसेच मतदार संघातील उपेक्षितांवर थोपवू नये अन्यथा यंदाही काँग्रेस पक्षाला नाईलाजास्तव पराभवाचा सामना करावा लागेल.
केवळ विधानसभा डोळ्यासमोर ठेवून या काँग्रेसने त्याच्या पुत्राने मतदार संघात जनसंपर्क वाढविला असून ठिकठिकाणी भेटीगाठी देत आहे मात्र मतदार संघात त्यांच्या चिले सपाट्याच्या व्यतिरिक्त कोणीही प्रतिसाद देत नसल्याचे चित्र आर्मी केळापूर मतदारसंघात दिसत आहे खरंतर मागील पाच वर्षात कधी या काॅंग्रेसच्या जेष्ठ नेत्याच्या पुत्राला मतदारसंघातील जनतेच्या समस्या दिसल्याच नाही केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेवून मतदारांच्या पायावर माथा टिकण्याकरिता दौरे सुरू आहे की काय असे मतदारसंघात चर्चिल्या जात आहे.
त्या" ला मतदारसंघावर थोपवू नका अन्यथा पराभव पक्का
Bhagirath Raja 24 News.com
0


टिप्पणी पोस्ट करा