निराधार व श्रावणबाळच्या लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करावे
यवतमाळ, दि.27 : संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांना यापुढे महा डीबीटी प्रणालीद्वारे लाभ वितरीत केल्या जाणार आहे. त्यासाठी आवश्यक कागदपत्र संबंधित लाभार्थ्यांनी तहसिलमध्ये सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
यवतमाळ नगर परिषद क्षेत्रातील संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना लाभार्थ्यांना यापुढे त्यांचे अनुदान महा डीबीटी प्रणालीद्वारे ऑनलाईन पध्दतीने वितरीत करण्यात येणार आहे. त्यासाठी लाभार्थ्यांनी आपले आधार कार्ड व पासबुकची छायांकीत प्रत तसेच मोबाईल नंबर संजय गांधी योजना, नगर परिषद क्षेत्र विभाग, तहसिल कार्यालय यवतमाळ येथे सादर करावे. तसेच लाभार्थ्यांनी आपले आधारकार्ड व मोबाईल नंबर बँकेशी लिंक करुन घ्यावे, असे तहसिलदार डॉ.योगेश देशमुख यांनी कळविले आहे.
निराधार व श्रावणबाळच्या लाभार्थ्यांनी कागदपत्र सादर करावे
Bhagirath Raja 24 News.com
0

टिप्पणी पोस्ट करा