आज महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन

आज महाराष्ट्राची उद्योग भरारी कार्यक्रमाचे आयोजन
यवतमाळ, दि.26 : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत महाराष्ट्राची उद्योग भरारी हा कार्यक्रम उद्या शुक्रवार दि.27 सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता हॉटेल ग्रँड महफिल, कॅम्प, अमरावती येथे आयोजित करण्यात आला आहे. कार्यक्रमास लोकप्रतिनिधी, अधिकारी, औद्योगिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित आहे. महाराष्ट्र शासनाने औद्योगिक क्षेत्रात प्रगती करण्यासाठी सुरु केलेल्या विविध उपक्रमांची माहिती व लगतच्या काळात या संदर्भात होऊ घातलेल्या औद्योगिक विकासाबाबतचा माहितीपट सादरीकरण करण्यात येणार आहे. तसेच मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रमाच्या लाभार्थ्यांना प्रातिनिधीक स्वरुपात अनुदान वितरण तसेच सत्कार करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विविध योजनांशी संबंधित लाभार्थी, उद्योजक, औद्योगिक संघटना व त्यांच्या प्रतिनिधींनी या कार्यक्रमास उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राच्या महाव्यवस्थापकांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...