⚡ ब्रेकिंग News

साकुर भोसा रेती घाटावरील गोळीबारातील आरोपी अटक*

*साकुर भोसा रेती घाटावरील गोळीबारातील आरोपी अटक*
आर्णी गणेश एकंडवार आर्णी मागील सहा महिन्यापूर्वी तालुक्यातील साकुर भोसा रेती घाटावर रेती माफियाकडून सुसाट गोळीबार झाल्याची घटना 28/3/2024 रोजी घडली होती. त्यामध्ये काही आरोपी पसार झाले होते. भोसा साकुर रेती घाटावर दिनांक 28 मार्च रोजी झालेल्या गोळीबार प्रकरणी आर्णी पोलीस स्टेशन येथे अपराध क्रमांक 314/2024 कलम 143, 144, 145, 146, 147,148,149,341,324,307,427,504,506, भा द वि सहकलम 3,7,25,27, आर्म सहकलम 135 म. पो. का. अन्वये गुन्हे दाखल करण्यात आले
असून सदर गुन्ह्यात मागील सहा महिन्यापासून प्रसार आरोपी सोहिल शब्बीर निरबान वय 26 वर्ष राहणार लोहार लाईन पुसद हा घटनेनंतर प्रसार असल्याने त्यांचा शोध घेण्यात आला दिनांक २५ सप्टेंबर रोजी मध्यरात्री त्यास पुसद येथून सीताफिने अटक करण्यात आली. त्यास आज स्थानिक न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली सदर कार्यवाही मा. श्री. कुमार चिंता पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ, मा. श्री. पियुष जगताप अपर पोलीस अधिक्षक साहेब यवतमाळ, मा.श्री. चिलुमुला रजनिकांत सहायक पोलीस अधिक्षक तथा उपविभागीय पोलीस अधिकारी साहेब दारव्हा याचें मार्गदर्शनाखाली पो.नि. केशव ठाकरे साहेब. नितीन वास्टर, मनोज चव्हाण, ऋषीकेश इंगळे,नफिज शेख, चालक सचिन पिसे, यांनी केली

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...