पोलीस मुख्यालय येथील स्कॉटिंग व्हॅन चा भीषण अपघात

*पोलीस मुख्यालय येथील स्कॉटिंग व्हॅन चा भीषण अपघात*
नागपूर तुळजापूर महामार्गावरील लोणबेळ येथील घटना आर्णी गणेश एकंडवार आज दिनांक 11 सप्टेंबर 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता चे दरम्यान लोनबेहळ येथे पोलिसांच्या वाहनाचा अपघात झाल्याच्या माहितीवरून त्या ठिकाणी आर्णी पोलीस देशमुख साहेब, दानडे साहेब यांचे सह लोनबेहळ येथे गेले, असता त्या ठिकाणी पोलीस मुख्यालय येथील स्कॉटिंग व्हॅन ही यवतमाळ वरून माहूरपर्यंत खजाना ड्युटी करून परत यवतमाळ येथे जात असताना. त्यांचे पोलीस महिंद्रा सिल्वर रंगाची MH 29 M 9719 या वाहनाचा उजव्या बाजूचा ड्रायव्हर साईटचा समोरील टायर फुटून हे वाहन एका कंटेनर CG 07CA 5532 वाहनाला धडकल्याने अपघात झाला. त्या अपघातात इम्रान शेख,आशिष चौबे,गौतम शेख,मुनेश्वर पोलिस अंमलदार जखमी झाले. असून ते पुढील उपचाराकरिता यवतमाळ येथे पाठविण्यात आले. सर्व नेमणूक पोलीस मुख्यालय यवतमाळ येथील होते. सदर ठिकाणी स्टाफ हजर असून रस्ता सुरळीत सुरू केला. माननीय पोलीस अधिकारी श्री. रजनीकांत चिलूमुला, ठाणेदार केशव ठाकरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सागर दानडे, प्रशांत देशमुख, बीट जमादार सतीश चौधार, अशोक टेकाळे, पोलीस अमलदार राम ढाकणे, अमोल कानेकर, योगेश गिरी, प्रदीप खडके, महामार्ग पोलीस मदत केंद्र कोसदांनी येथील अधिकारी व अंमलदार तसेच मोटर वाहन विभाग येथील मोटार परिवहन विभाग येथील अधिकारी व तांत्रिकी यांनी येऊन घटनास्थळी भेट दिली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...