मानसिक छळ प्रकरणी युवतीने केली आत्महत्या फोटो व्हायरल करण्याची धमकी

मानसिक छळ प्रकरणी युवतीने केली आत्महत्या फोटो व्हायरल करण्याची धमकी तालुक्यातील कोपरा येथील घटना
आर्णी:-तालुक्यातील कोपरा येथील २१ वर्षीय महाविद्यालयीन तरुणीने शारीरिक व मानसिक छळापायी कीटकनाशक औषध प्राशन करून जीवनयात्रा संपविल्या प्रकरणी आर्णी पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अनुराधा भीमराव ढोके (२१)असे मृतक तरुणीचे नाव आहे.मृतक अनुराधा ही शहरातील भारती महाविद्यालयात शिक्षण घेत होती.मृतकाचे व संशयित आरोपी भूषण भुजाडे(२६) यांचे प्रेमसंबंध मागील वर्षभरापासून असल्याने नेहमी परस्पर भेटणे,फोनवर बोलणे होत होते.त्यात त्यांचे दोघांचे फोटो एकमेका जवळ होते.त्याच कारणावरून त्यांच्यात नेहमी वाद होत असे.दि.९ सप्टेंबर रोजी मृतक अनुराधा गावातील एका घरात महालक्ष्मी च्या आरतीला जात असताना वाटेतच आरोपी भूषण हा कोपरा परिसरात आरोपीने मृतक अनुराधा ला अडवून तिच्या सोबत वादविवाद करीत असल्याने गावातील काही लोकांनी त्यांच्या वादाचे निपटारा केला.परंतु आरोपी हा शिवीगाळ करीत होता अशातच आरोपीने मृतक अनुराधाला तुझे अश्लील फोटो व्हायरल करण्याची धमकी दिल्याने मृतक अनुराधा घाबरून आपल्या घरी गेली व आपले फोटो सोशल मीडियावर व्हायरल होईल या भीतीने घरातील शेतात फवारणी करण्यासाठी आणलेले कीटकनाशक औषधी तिने प्राशन करून खाली कोसळली घराशेजारी राहणाऱ्या लोकांना खाली पडल्याचा आवाज आला असता कीटकनाशक औषध प्राशन केल्याचे दिसून आल्याने तिला तात्काळ आर्णी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले असता डॉक्टरांनी प्रकृती चिंताजनक असल्याने तात्काळ यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात पाठविले मात्र यवतमाळ येथील शासकीय रुग्णालयात डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले.दि.१० सप्टेंबर रोजी मृतकाचे शवइच्छेदन करून अंतिमसंस्कार करण्यात आले.या प्रकरणी मृतकाचा भाऊ गणेश भीमराव ढोके यांच्या तक्रारीवरून दि.१३ सप्टेंबर रोजी आर्णी पोलीस स्टेशनला संशयित आरोपी भूषण भुजाडे (२६) याच्यावर १०८,२९६,३५१(२)३५१(३)३५२ अंतर्गत कलमान्वे गुन्हे दाखल आरोपीस अटक करण्यात आली आहे.या घटनेचा तपास आर्णी पोलीस करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...