आर्णीमध्ये ड्रग्स विक्रीचा भांडाफोड: 18.15 ग्रॅम हेरोइन आणि 27 किलो डोडा पावडर जप्त
आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश
यवतमाळ जिल्हयात कोणत्याही प्रकारचे अवैध धंदे, शस्त्र बाळगणा-या तसेच अउघड गुन्हे, आरोपी शोध, अवैध धंदे तसेच गुंगीकारक औषधद्रव्याची तस्करी समुळ उच्चाटन व्हावे याकरीता मा. पोलीस अधीक्षक श्री. कुमार चिंता (भा.पो.से) यांनी पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना आदेशीत केले होते. त्याच अनुषंगाने पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी त्याचे अधिनस्थ पथकांना गोपनिय माहीती काढून प्रभावी छापा कारवाई करणे बाबत सुचना दिल्या आहेत.
दिनांक 18/02/2026 रोजी स्थानिक गुन्हे शाखा पथक यवतमाळ कॅम्प पुसद हे पुसद उपविभागात पेट्रोलींग करीत असतांना 15/30 वाजता सुमारांस गुप्त बातमीदारा मार्फत बातमी मिळाली कि, पोलीस स्टेशन आर्णी हददीतील सरबजीतहसंग ऊर्फ करण ढिलोन हा त्याचे मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या दशमेश पंजाबी ढाबा येथे अंमली पदार्थ Heroin (चिट्टा) व Poppy Straw (डोडा पावडर) अंमली पदार्थ विक्री करीत आहे. अशी माहीती मिळाल्याने त्या संदर्भात प्राप्त माहिती वरुन पथकाने तात्काळ वरिष्ठांना याबाबत अवगत करुन वरिष्ठांच्या परवानगीने पोलीस स्टेशन आर्णी हददीत मौजे सुकळी शिवारातील नागपूर-तुळजापूर हायवे लगत असलेल्या सरबजीतसिंग ऊर्फ करण ढिलोन याचे दशमेश पंजाबी ढाबा येथे रात्री 19/30 वाजता राजपत्रीत अधिकारी, कृषी अधिकारी, पंच व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी अतिशय कौशल्यपुर्णरितीने छापा टाकून दोन इसमांस ताब्यात घेवून त्यांना त्याचे नाव गाव विचारले असता त्यांनी त्याचे नाव सरबजीतसिंग ऊर्फ करण भुटटासिंग ढिलोन वय 37 वर्ष, रा. दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आर्णी जि. यवतमाळ जगिरसिंग मख्त्यारसिंग सिंधू वय 53 वर्ष, रा.दशमेश पंजाबी ढाबा नागपूर-तुळजापूर हायवे रोड सुकळी शिवार ता. आणि जि. यवतमाळ असे सांगितले. त्याचे समक्ष दशमेश पंजाबी ढाबा यांची झडती घेतली असता ढाब्यामध्ये अंमली पदार्थ 18.15 ग्रॅम Heroin (चिट्टा) किंमत 1,81,500/-रु तसेच Poppy Straw (डोडा पावडर) 27 किलो 721 ग्रॅम किंमत 1,38,605 व इतर साहीत्य असा एकूण 3,35,245/-रु चा मुददेमाल जप्तीसह नमूद इसमा विरुध्द अंमली औषधी व मनप्रभावी पदार्थ अधिनियम 1895 चे कलम 8 (c), 15 (b), 21(b) अन्वये पोलीस स्टेशन आर्णी येथे गुन्हा नोंदीसह कार्यवाही करण्यात आली आहे.
सदरची कारवाई मा पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. कुमार चिंता (भा.पो.से) सा, मा.अपर पोलीस अधीक्षक यवतमाळ श्री. अशोक थोरात (म.पो.से) सा तसेच मा.उपविभागीय पोलीस अधिकारी दारव्हा श्री. सिध्देश्वर भोरे सा, मा. पोलीस निरीक्षक श्री. सतीश चवरे, स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि/धिरज बांडे, सपोनि मनिष गावंडे, पोउपनि/शरद लोहकरे, पोहवा/संतोष भोरगे, पोहवा कुणाल मुंडोकार, पोहवा/तेजाब रणखांब, पोहवा/सुभाष जाधव, पोहवा रमेश राठोड, पोशि/सुनिल पंडागळे, चापोउपनि रविंद्र शिरामे, चापोशि/राजेश जाधव सर्व नेम-स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ तसेच मा. नायब तहसिलदार आर्णी श्री संतोष आदगुलवाड, कृषी अधिकारी आर्णी श्री. आनंद बदखल, फॉरेन्सीक टिम यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



टिप्पणी पोस्ट करा