जगतगुरु संत रविदास महाराज यांची जयंती उत्सव साजरी*

 *जगतगुरु संत रविदास महाराज यांची जयंती उत्सव साजरी*



आर्णी येथील गुरु रविदास बहुउदेशिय संस्थाच्या वतीने जगतगुरु संत रविदास महाराज यांची जयंती उत्सवात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमा निमित्य संत रविदास नगर येथुन भव्य शोभायात्रा काढण्यात आली.त्या नंतर रेणुका मंगल कार्यालय येथे कार्यक्रम घेण्यात आला.या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुधाकर उध्दव वाडेकर, सत्कारमूर्ती म्हणून नवनिर्वाचित नगराध्यक्ष मा. श्री. नालंदाजी भरणे साहेब , उपनगराध्यक्ष मा.श्री.निलेशभाऊ गावंडे व यवतमाळ नगर परिषदेच्या नवनिर्वाचित नगरसेविका सौ. स्वाती अभिलाष खंडारे , कार्यक्रमाचे उदघाटक आर्णी चे ठाणेदार मा.श्री.निलेश सुरटकर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.सुरेश खंडारे, श्री.हरीभाऊ खंडारे, श्री.देवानंद पांढरे प्रमुख वक्ते मा.श्री.गजानन घुबडे हे होते. 

 


या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीकांत वानखडे यांनी केले त्यानंतर मान्यवरांचे मार्गदर्शन झाले. त्या नंतर मा.श्री.गजानन घुबडे यांनी गुरू रविदास महाराज यांच्या जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी दलित मित्र लक्ष्मणराव कोरटकर यांच्या स्मृति प्रित्यर्थ श्री.रमेश कोरटकर यांच्याकडुन छोट्या छोट्या चिमुकल्यांच्या भाषणाला बक्षीस देण्यात आली. या कार्यक्रमाचे संचालन सौ दीक्षा गोडवे आभार अनिल खंडारे यांनी केले.या कार्यक्रमाला गुरु रविदास महिला आघाडीच्या अध्यक्षा श्रीमती लिलाबाई वानरे, गुरु रविदास युवा मंच अध्यक्ष रोहित पाटील यांच्यासह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

         


या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अनिल खंडारे,राजु वाडेकर, संतोष पाचखंडे, गणेश पांढरे, संतोष गोडवे, मनोज माघाडे, निळकंठ पाटेकर, गजानन गोडवे, दिपक वानरे, संतोष र.पाचखंडे, श्रावण सोनटक्के, विजय वासनिक, भास्कर भोकरे, राजु धाडवे, विशाल वाडेकर,वैभव माघाडे, प्रतिक वाडेकर, विक्रांत नाचणे ,शुभम वाडेकर, राहुल पानझडे, साई वानखडे,लखन भोकरे,उमेश गोडवे, अनिकेत खंडारे,चंचल इंगळे,निता खंडारे, सोनू पाचखंडे, सारिका गोडवे, सविता वाडेकर, रिमा गोडवे,वनिता वाडेकर, स्वाती वानखडे, यांनी परीश्रम घेतले

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...