ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत APL क्रिकेट स्पर्धेचा निधी रुद्राश्रमास सुपूर्त

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत APL क्रिकेट स्पर्धेचा निधी रुद्राश्रमास सुपूर्त 



आर्णी : यांच्या वतीने ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी दिनांक 16/02/2026 ते 22/02/2026 या कालावधीत APL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेमुळे परिसरातील युवकांना आपले क्रिकेट कौशल्य सादर करण्याची संधी मिळाली तसेच क्रीडा संस्कृतीला चालना मिळाली.


स्पर्धेच्या समारोपप्रसंगी ठाणेदार यांनी विजेत्या संघासह इतर खेळाडूंना बक्षिसांचे वितरण केले होते. त्यावेळी स्पर्धेच्या नियोजनातून जमा झालेल्या निधीपैकी बक्षीस वितरण व इतर खर्च वजा करून उर्वरित संपूर्ण रक्कम सामाजिक कार्यासाठी देण्यात येणार असल्याची घोषणा त्यांनी केली होती.


त्या अनुषंगाने दिनांक 26/02/2026 रोजी पोलीस स्टेशन आर्णी येथे ठाणेदार निलेश सुरडकर साहेब यांच्या हस्ते, पोलीस अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत चे संचालक यांना रुपये 40,000/- (चाळीस हजार रुपये) निधी सुपूर्त करण्यात आला.


यावेळी API पारडकर, PSI राठोड, PSI देशमुख, अंमलदार मनोज चव्हाण तसेच बोईनवाड, संकुलवार, रवी चव्हाण, सुजीत जाधव, संदीप ढेंगे, शेळके, नितीन वास्टर, टाले आदी पोलीस अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या उपक्रमामुळे क्रीडा आणि समाजसेवा यांचा सुंदर संगम घडून आला असून पोलीस प्रशासनाच्या सामाजिक बांधिलकीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...