मि Mittsue Olympiad (EXOM 2025-26) मध्ये श्री गुरुदेव इंग्लिश मिडीयम स्कूल, जवळा यांचे घवघवीत यश

 मित्सु ऑलिंपियाड Mittsue Olympiad (EXOM 2025-26) मध्ये श्री गुरुदेव इंग्लिश मिडीयम स्कूल, जवळा यांचे घवघवीत यश



जवळा : Mittsure Olympiad अंतर्गत घेण्यात आलेल्या EXOM 2025-26 या स्पर्धा परीक्षेत श्री गुरुदेव इंग्लिश मिडीयम स्कूल, जवळा येथील एकूण २९ विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला. सदर परीक्षा डिसेंबर महिन्यात पार पडली असून तिचा निकाल फेब्रुवारी २०२६ मध्ये जाहीर करण्यात आला.

प्रथम ही परीक्षा जिल्हा पातळीवर घेण्यात आली होती. या परीक्षेत सहभागी झालेल्या २९ विद्यार्थ्यांपैकी तब्बल ११ विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय दुसऱ्या (2nd Level) परीक्षेसाठी निवड झाली आहे. या यशामुळे शाळेच्या शैक्षणिक गुणवत्तेची पुन्हा एकदा प्रचिती आली आहे.


जिल्हा पातळीवर उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांची नावे पुढीलप्रमाणे आहेत —१) किशिका गणेश जाधव (इयत्ता ३री) – विषय: गणित – जिल्ह्यात प्रथम क्रमांक २) श्रावणी धीरज नाईक (इयत्ता ३री) – विषय: विज्ञान – जिल्ह्यात तृतीय क्रमांक ३) वैदही आकाश गायकवाड (इयत्ता ३री) – विषय: विज्ञान – जिल्ह्यात चतुर्थ क्रमांक ४) आर्यन प्रफुल नेहारे (इयत्ता ४थी) – विज्ञान विषयात जिल्ह्यात चौथा क्रमांक व गणित विषयात जिल्ह्यात आठवा क्रमांक ५) सुरज अनिल चौधरी – जिल्ह्यात पाचवा क्रमांक ६) स्वराज उमेश गुघाने – जिल्ह्यात सहावा क्रमांक ७) मनस्वी गजानन निमखंडे – जिल्ह्यात सातवा क्रमांक ८) पवन विनोद आवझाडे – जिल्ह्यात आठवा क्रमांक ९) आराध्या निलेश पिसे (इयत्ता ४थी) – विषय: गणित – जिल्ह्यात आठवा क्रमांक १०) प्रसिद्धी गजानन चोपडे (इयत्ता १ली) – विषय: गणित – जिल्ह्यात सातवा क्रमांक


या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळविणाऱ्या विद्यार्थ्यांना गोल्ड मेडल व चॅम्पियन सर्टिफिकेट देऊन गौरविण्यात आले, तर तृतीय क्रमांकासाठी ब्राँझ मेडल व चॅम्पियन सर्टिफिकेट प्रदान करण्यात आले. तसेच इतर यशस्वी विद्यार्थ्यांनाही चॅम्पियन सर्टिफिकेट देण्यात आले.



पुरस्कार वितरण समारंभास श्री गुरुदेव प्रसारक मंडळ, जवळा यांचे सचिव गणेशराव मोरे तसेच अध्यक्ष श्री सोळके सर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. त्यांच्या हस्ते सर्व विद्यार्थ्यांना पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.विद्यार्थ्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व पालकांनी अभिनंदन करून पुढील राज्यस्तरीय परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...