⚡ ब्रेकिंग News

ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी क्रिकेट प्रिमियर लीगचे भव्य आयोजन; २ लाख २२ हजारांची बक्षिसे

 ऑपरेशन प्रस्थान अंतर्गत आर्णी क्रिकेट प्रिमियर लीगचे भव्य आयोजन; २ लाख २२ हजारांची बक्षिसे



आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 


आर्णी : पोलीस स्टेशन आर्णी यांच्या वतीने ‘ऑपरेशन प्रस्थान’ अंतर्गत आर्णी क्रिकेट प्रिमियर लीगचे आयोजन करण्यात आले आहे. सदर स्पर्धा दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ ते २२ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत पार पडणार आहे.

या क्रिकेट प्रिमियर लीगचा उद्घाटन सोहळा सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ९.३० वाजता होणार असून स्पर्धा हेलिपॅड ग्राऊंड, देऊरवाडा पुनर्वसन येथे आयोजित करण्यात आली आहे. युवकांमध्ये क्रीडा संस्कार, शिस्त व सामाजिक बांधिलकीची जाणीव निर्माण व्हावी, तसेच समाजात सकारात्मक वातावरण निर्माण व्हावे, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.



या स्पर्धेसाठी एकूण २ लाख २२ हजार रुपयांची आकर्षक बक्षिसे ठेवण्यात आली आहेत. प्रथम बक्षीस रुपये १,००,००० हे सौ. नीताताई राजेश आडे, गणपती संस्थान खेड यांच्या वतीने देण्यात येणार आहे. द्वितीय बक्षीस रुपये ७१,००० हे कोमल स्टोन केशर शिरपूर व शेखर खंदार यांच्या सहकार्याने देण्यात येणार आहे. तृतीय बक्षीस रुपये ५१,००० हे संदीप ज्वेलर्स आर्णी यांच्या वतीने देण्यात येणार आहे.



तरी सर्व पत्रकार बंधूंनी उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...