⚡ ब्रेकिंग News

महाशिवरात्री व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त आर्णी येथे पाटील दूध डेरी व समस्त दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने फराळ (महाप्रसाद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

 महाशिवरात्री व संत सेवालाल महाराज जयंती निमित्त आर्णी येथे पाटील दूध डेरी व समस्त दूध उत्पादक शेतकरी यांच्या वतीने फराळ (महाप्रसाद) कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. 



मुख्य संपादक गणेश एकंडवार 

कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते प्रतिमेस हार अर्पण व पूजन करून करण्यात आली. त्यानंतर उपस्थित भक्तांना फराळ (महाप्रसाद) वाटप करण्यात आले.



गेल्या सलग पाच वर्षांपासून पाटील दूध डेअरीचे संचालक अतुल पाटील वाकोडे हे जयंती व महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करत असून ते नेहमीच सामाजिक कार्यात सक्रिय असतात. सर्व धर्मसमभाव ही त्यांची विशेष ओळख मानली जाते.



या कार्यक्रमाला प्रमुख मान्यवर म्हणून अनिल आडे, राजुदास जाधव, प्रिया तोडसाम, राजेश श्रीवास,प्रवीण देशमुख, संजय जाधव पाटील, सचिन ठाकरे, निखिल ब्राह्मणकर, मामा ठाकरे, बबलू देशमुख, परवेज बेग, प्रेम राठोड व आदी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दूध उत्पादक शेतकरी व स्थानिक नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदविला.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...