पोलीस स्टेशन आर्णी येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

 पोलीस स्टेशन आर्णी येथे विद्यार्थ्यांची शैक्षणिक भेट

कायद्यांविषयी व पोलीस कामकाजाबाबत सविस्तर मार्गदर्शन



आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 


आर्णी : दिनांक २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी ११ ते १२ वाजेदरम्यान Euro Kids इंग्लिश मीडियम स्कूल येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींनी पोलीस स्टेशन आर्णी येथे शैक्षणिक भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांना पोलीस ठाण्यातील दैनंदिन कामकाजाची प्रत्यक्ष माहिती देण्यात आली.


पोलीस ठाण्यातील कामकाज कशा पद्धतीने चालते, CCTNS प्रणाली, VHF प्रणाली, ‘आपले सरकार’ पोर्टल, एफआयआर नोंदणी प्रक्रिया, स्टेशन डायरी, अंमलदारांची जबाबदारी, नवीन कायदे, सायबर गुन्हे व सोशल मीडिया, लैंगिक छळ प्रतिबंध, वाहतूक नियम आदी विविध विषयांवर सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. तसेच ‘आपले सरकार’ पोर्टलवर उपलब्ध सेवा, ऑनलाईन कॅरेक्टर सर्टिफिकेट, पासपोर्ट पडताळणी प्रक्रिया याबाबतही माहिती देण्यात आली.



महिला व बालकांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदे, मदत कक्षाची कार्यपद्धती, ऑनलाईन फसवणूक, मोबाईल चोरी प्रकरणे हाताळण्याची पद्धत, सायबर रिसोर्स पर्सनची कर्तव्ये तसेच डायल ११२ आपत्कालीन सेवा कशा प्रकारे कार्य करते याबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. याशिवाय पोलीस ठाण्यातील शस्त्रास्त्रांची माहिती व त्यांचा वापर कशाप्रकारे केला जातो याबाबत थोडक्यात माहिती देण्यात आली.



यावेळी पोलीस निरीक्षक निलेश सुरडकर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करताना, “आपण सुजाण नागरिक म्हणून आपल्या परिसरात घडणाऱ्या संशयास्पद किंवा अनपेक्षित घटनांची माहिती वेळोवेळी पोलिसांना देऊन सार्वजनिक शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे,” असे आवाहन केले.



या कार्यक्रमास पोलीस नाईक गजानन हरणे, पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण, राजन राठोड, महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी उघडे, गीता मुंडे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका सोनाली बागेश्वर, सहाय्यक शिक्षिका प्रीती क्षीरसागर, लावण्या चव्हाण, कल्याणी जगताप, अंजली चिंतावार, शारदा क्षीरसागर, नंदा मंडलवार व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना पोलीस प्रशासनाविषयी प्रत्यक्ष माहिती मिळून कायद्याबद्दल जागरूकता निर्माण झाली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...