जि.प. जवळा-लोणी गटात संयुक्त बैठक व कार्यकर्ता कार्यशाळा उत्साहात

 जि.प. जवळा-लोणी गटात संयुक्त बैठक व कार्यकर्ता कार्यशाळा उत्साहात



आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 

जवळा : जि. प. जवळा-लोणी गटातील प्रभारी पदाधिकारी, बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख व गल्ली प्रमुख यांची संयुक्त बैठक तसेच आगामी निवडणुकांच्या अनुषंगाने कार्यकर्ता कार्यशाळा सोमवार दिनांक २ मार्च २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता ग्रामपंचायत जवळा येथील सावित्री फुले सभागृह येथे उत्साहात संपन्न झाली.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आर्णी-केळापूर मतदारसंघाचे आमदार राजू तोडसाम हे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री. नितीनभाऊ गिरी (गटनेते, भारतीय जनता पक्ष, न. प. यवतमाळ) यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.



यावेळी अध्यक्षीय भाषणात आमदार राजू तोडसाम यांनी आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर संघटन बळकटीकरण, बूथस्तरावरील नियोजन, मतदारांशी सातत्यपूर्ण संपर्क आणि पक्षाच्या धोरणांचा प्रभावी प्रचार यावर भर दिला. प्रत्येक बूथ सक्षम झाल्यास विजय निश्चित होतो, असे त्यांनी नमूद केले.प्रमुख मार्गदर्शक नितीनभाऊ गिरी यांनी कार्यकर्त्यांना निवडणूक व्यवस्थापन, संघटनात्मक शिस्त, तसेच शक्तीकेंद्र व बूथ पातळीवरील जबाबदाऱ्या याबाबत सविस्तर मार्गदर्शन केले. कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करून गटात पक्षाची ताकद वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.



कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अविनाश ढाकुरकर यांनी केले.तर प्रस्ताविक विजय सोळंके यांनी केले. या बैठकीस जवळा-लोणी सर्कलमधील सर्व बूथप्रमुख, शक्तीकेंद्र प्रमुख, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बैठक व कार्यशाळेमुळे आगामी निवडणुकांच्या दृष्टीने संघटनात्मक तयारीला वेग मिळाल्याचे दिसून आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...