शिवरायांच्या विचारांनी दुमदुमणार आर्णी शहर ; सुप्रसिद्ध व्याख्याते सचिन दादा पाटील यांचे व्याख्यान
आर्णी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त तिथीनुसार आर्णी शहरात श्री शिवछत्रपती जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा शुक्रवार, दि. ६ मार्च रोजी सायंकाळी ६ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
या कार्यक्रमात पुणे येथील सुप्रसिद्ध व्याख्याते सचिन दादा पाटील हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार असून ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रम, हिंदवी स्वराज्याची स्थापना तसेच आजच्या तरुणांनी त्यांच्या विचारांतून घ्यावयाची प्रेरणा यावर मार्गदर्शन करणार आहेत. त्यांच्या प्रेरणादायी व्याख्यानातून शिवप्रेमींना इतिहासाची उज्ज्वल प्रेरणा मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.
हा कार्यक्रम श्रीमद भारती शाळेचे मैदान, श्री शिवनेरी चौक, आर्णी येथे पार पडणार असून परिसरातील शिवप्रेमी, युवक तसेच नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.या भव्य सोहळ्याचे आयोजन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, आर्णी विभाग यांच्या वतीने करण्यात आले असून कार्यक्रमाच्या तयारीसाठी कार्यकर्ते उत्साहाने कामाला लागले आहेत.



टिप्पणी पोस्ट करा