कृष्णनगर (केळझरा )येथील तलावातील मोफत गाळा चे वाटप
शिबिराच्या पहिल्या टप्प्याच्या माध्यमातून महसूल विभागाचा उपक्रम
आर्णी :तालुक्यातील कृष्णनगर (केळझरा व.)येथे, दिनांक १७ मार्च 2026 रोजी येथील छोटेखाणी तलावामध्ये गट ग्रामपंचायत केळझरा वरठी येथे,महसूल विभागामार्फत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियानातील पहिल्या टप्पा अंतर्गत शिबिराचे आयोजन करण्यात आले.यादरम्यान आर्णी तहसीलदार वैशाख वाहुरवाघ हे अध्यक्षस्थानी होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून गट ग्रामपंचायत कृष्णनगर केळझरा (वरटी) येथील प्रथम नागरिक सरपंच मेश्राम ताई,व मा. जी.प. सदस्य प्रकाश राठोड हे होते.
तर निवासी तहसीलदार उदय तुंडलवार या प्रामुख्याने हजर राहून व इतर मान्यवरांच्या हस्ते कृष्णनगर तलावातील महसूल विभागा अंतर्गत गाळ वाटपाचा भूमिपूजन करण्यात आला.महसूल विभागाने गाळ मोफत वाटपाचा उपक्रम राबविला असून,नागरिकांना जास्तीत जास्त लाभ कसे घेता येईल,या करिता सेवा सुविधा व सुलभ व्हाव्यात शासन आपल्या दारी या हेतूने योजनांचा लाभ जनतेने व नागरिकांनी जास्तीत जास्त लाभ घेण्याचे करावे.असे आर्णी चे तहसीलदार वैशाख वाहूरवाघ अध्यक्षीय संवादातून नागरिकांना आवाहन केले.या अंतर्गत गावातील गरजू लाभार्थ्यांना तलावातील गाळ मोफत वाटप तात्काळ चालू केले.गावकऱ्यांनी शासनाचे आभार मानले.या शिबिरांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून मोलाचे मार्गदर्शन देताना उपयुक्त असा तलावातील गाळ हा शेती करिता वर्तमानात व भविष्याच्या दृष्टीने नव संजीवनी ठरेल.
असे उदगार सरपंच मेश्राम व प्रकाश राठोड यांनी नागरिकांना केले.व तसेच निवासी तहसीलदार उदय तुंडलवार आणि शिबिर यशस्वी तें करिता अथक परिश्रम घेत तालुक्यातील आणि सावळी परिसरातील संपूर्ण महसूल विभागाची टीम,मंडळ अधिकारी सपरवार, तलाठी या सह गावातील प्रतिष्ठित नागरिक नुनेश्वर राठोड, आकाश राठोड,व इतर,गावकऱ्यांच्या मोठ्या संख्येने हजेरीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.



टिप्पणी पोस्ट करा