आर्णी शहरात २० मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम

 आर्णी शहरात २० मार्चपासून अतिक्रमण हटाव मोहीम



आर्णी : शहरातील मुख्य मार्गांवरील वाढत्या अतिक्रमणाच्या पार्श्वभूमीवर दिनांक २० मार्च २०२६ पासून आर्णी शहरात अतिक्रमण हटाव मोहीम राबविण्यात येणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. ही कारवाई सार्वजनिक बांधकाम विभागाच्या (PWD) हद्दीत करण्यात येणार असून संबंधित विभागाकडून आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे.


या मोहिमेअंतर्गत शहरातील प्रमुख रस्त्यांवरील अनधिकृत बांधकामे, फूटपाथवरील अडथळे तसेच रस्त्यावर झालेले अतिक्रमण हटविण्यात येणार असल्याचे समजते. त्यामुळे संबंधित अतिक्रमणधारकांनी वेळेत खबरदारी घ्यावी, असे आवाहनही करण्यात येत आहे.सूत्रांच्या माहितीनुसार खालील मार्गांवर ही मोहीम राबविण्यात येणार आहे –


मार्ग :

एमएसईबी कार्यालय ते बाबा कंबलपोष दर्गा मार्ग

माहूर चौक ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा मार्ग

शहरातील नागरिकांनी आणि व्यावसायिकांनी प्रशासनाच्या या कारवाईकडे गांभीर्याने पाहावे, तसेच मोठे-लहान असा कोणताही भेदभाव न करता सर्वांवर समान कारवाई व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, कारवाईदरम्यान कुठेही भेदभाव किंवा अन्याय होत असल्याचे आढळल्यास नागरिकांनी संबंधितांकडे तक्रार करावी, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...