यवतमाळ l कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार!

 यवतमाळ l कृषी क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांना मिळणार पुरस्कार!


 कृषी पुरस्कारासाठी २० मार्चपर्यंत ऑनलाईन अर्ज करावे

 जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांचे आवाहन

 जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी तसेच शेतकरी गट व संस्थांना कृषी विभागामार्फत पुरस्कार देण्यात येणार आहे. या पुरस्कारासाठी शेतकऱ्यांनी २० मार्चपर्यंत ॲानलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे.जिल्ह्यात कृषी क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी तसेच शेतकरी गट व संस्थांचा गौरव करण्यासाठी कृषि विभागामार्फत विविध राज्यस्तरीय, विभागस्तर व जिल्हास्तरावर विविध कृषी पुरस्कार दिले जातात. सन 2025-26 या वर्षासाठी कृषी क्षेत्रात उत्पादन वाढ, नवीन तंत्रज्ञानाचा वापर, सेंद्रिय शेती, महिला सहभाग, शेतीमधील नवकल्पना इत्यादी बाबीमध्ये उत्कृष्ट काम करणाऱ्या शेतकऱ्यांचा या पुरस्काराद्वारे सन्मान करण्यात येतो. या पुरस्कारांसाठी पात्र शेतकऱ्यांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावेत, असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी यांनी केले आहे.


कृषी पुरस्कार व बक्षीस :डॉ पंजाबराव देशमुख कृषीरत्न पुरस्कार : पात्रता उत्कृष्ट शेतकरी, बक्षीस स्वरुप ३ लाख रुपयेचा धनादेश, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक /पतीसह वसंतराव नाईक कृषीभूषण पुरस्कार : पात्रता शेतीतील विशेष कामगिरी, बक्षीस स्वरुप 2 लाख रुपयेचा धनादेश, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक पतीसह सत्कार,  जिजामाता कृषीभूषण पुरस्कार : पात्रता महिला शेतकरी महिला गट,बक्षीस स्वरुप २ लाख रुपयेचा धनादेश, स्मृती चिन्ह, प्रशस्तीपत्र व सपत्नीक पतीसह सत्कार सेंद्रीय शेती कृषिभूषण पुरस्कार : पात्रता सेंद्रिय शेती करणारे शेतकरी बक्षीस स्वरुप २ लाख रुपयेचा धनादेश ,स्मृती चिन्ह ,प्रशस्तीपत्र व सपत्नीक पतीसह सत्कार युवा शेतकरी पुरस्कार: पात्रता प्रगत युवा शेतकरी,बक्षीस स्वरुप 1 लाख 20 हजार रुपयेचा धनादेश, स्मृती चिन्ह , प्रशस्तीपत्र व सपत्नीक पतीसह सत्कार शेतीमित्र पुरस्कार : पात्रता शेती मार्गदर्शन विस्तार कार्य बक्षीस स्वरुप १ लाख २० हजार रुपयेचा धनादेश स्मृती चिन्ह ,प्रशस्तीपत्र व सपत्नीक पतीसह सत्कार उद्यान पंडित पुरस्कार : पात्रता बागायती क्षेत्रातील उत्कृष्ट काम १ लाख रुपयेचा धनादेश, स्मृती चिन्ह , प्रशस्तीपत्र व सपत्नीक पतीसह सत्कार वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार: पात्रता सर्वसाधारण व आदिवासी गटांकरिता जिल्ह्यातून प्रत्येकी एक बक्षीस स्वरुप ४४ हजार रुपेयचा धनादेश ,स्मृती चिन्ह ,प्रशस्तीपत्र व सपत्नीक पतीसह सत्कार या विविध पुरस्काराने शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात येणार आहे. पात्र शेतकरी, महिला शेतकरी, युवा शेतकरी, शेतकरी गट व संस्था यांच्या पुरस्कार प्रस्तावाची प्रक्रिया अधिक सुलभ वेळबद्ध ,पारदर्शक व प्रभावी करण्याच्या दृष्टीने कृषी विभागामार्फत पुरस्कार प्रस्ताव ऑनलाइन स्वरूपात स्वीकारण्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली विकसित करण्यात आली आहे. ही प्रणाली कृषी विभागाच्या https://krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळावर कृषी पुरस्कार टॅबमध्ये उपलब्ध आहे.


ऑनलाईन अर्ज कसा करावा :  

कृषी विभागाच्या ऑनलाईन कृषी पुरस्कार पोर्टल https://krishi.maharashtra.gov.in ला भेट द्यावी, प्रथम नोंदणी (रजिस्ट्रेशन) करून लॉगिन करावे, उपलब्ध पुरस्कारांपैकी संबंधित पुरस्कार निवडावा, शेतीविषयक कामगिरी व उपक्रमांची माहिती भरावी, आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत, अर्ज तपासून फायनल सबमिट करावा, अर्ज सादर झाल्यानंतर एक्नॅालेजमेंट किंवा अर्जाची प्रत घ्यावी.

कागदपत्रे अपलोड करणे : 

आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करावीत: आधार कार्ड, 7/12/आठ अ जमीनीचे इतर कागदपत्रे, जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयाचा चारित्र्य प्रमाणपत्र, आधार लिंक मोबाईल नंबर व पासपोर्ट साईज फोटो, शेती उपक्रमाची माहिती व फोटो, उत्पादन किंवा तंत्रज्ञान वापराचे पुराने (प्रमाणपत्र किंवा वृत्तपत्र कात्रणे किंवा फोटो ई., कृषिवरील दैनंदिनी खर्च, इतर संबंधित प्रमाणपत्रे अपलोड करावे.या कृषी पुरस्कारांसाठी जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांनी, महिलांनी, युवा शेतकरी, शेतकरी गट व संस्था यांनी 20 मार्च 2026 पर्यंत ऑनलाईन अर्ज करून संधीचा लाभ घ्यावा, तसेच अधिक माहितीसाठी तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी सहाय्यक किंवा कृषी पर्यवेक्षक, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयास भेट द्यावी असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मनोजकुमार ढगे यांनी केले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...