यवतमाळ: 95 प्रशिक्षित चालक उमेदवारांचा इशारा – नियुक्ती न मिळाल्यास 27 एप्रिलपासून आमरण उपोषण

 यवतमाळ: 95 प्रशिक्षित चालक उमेदवारांचा इशारा – नियुक्ती न मिळाल्यास 27 एप्रिलपासून आमरण उपोषण



उपनिवड समिती स्थापन करून तातडीने नियुक्ती देण्याची मागणी; प्रशासनावर दिरंगाईचा आरोप

यवतमाळ, प्रतिनिधी:

पांढरकवडा येथील चालक प्रशिक्षण केंद्रातून अवजड वाहन चालक प्रशिक्षण पूर्ण केलेल्या सत्र 52, 53, 54 व 55 मधील 95 उमेदवारांनी नियुक्तीच्या मागणीसाठी आक्रमक भूमिका घेतली आहे. वारंवार निवेदने व स्मरणपत्रे देऊनही महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून कोणतीही ठोस कार्यवाही होत नसल्याचा आरोप उमेदवारांनी केला आहे.


उमेदवारांनी विभाग नियंत्रक, यवतमाळ यांना दिलेल्या अंतिम निवेदनात नमूद केले आहे की, सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण करून ते MEO चाचणीतही उत्तीर्ण झाले आहेत. मात्र, नियुक्ती प्रक्रिया रखडलेली असल्याने त्यांच्यावर आर्थिक संकट ओढवले आहे. त्यामुळे तातडीने उपनिवड समिती (Sub-Selection Committee) स्थापन करून नियुक्ती प्रक्रिया गतीमान करावी, अशी त्यांची प्रमुख मागणी आहे.


प्रशासनाने 26 एप्रिल 2026 पर्यंत ठोस निर्णय न घेतल्यास 27 एप्रिल 2026 पासून विभाग नियंत्रक कार्यालय, यवतमाळ समोर बेमुदत आमरण उपोषणास बसण्याचा इशारा उमेदवारांनी दिला आहे. उपोषणादरम्यान कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास त्याची सर्वस्व जबाबदारी प्रशासनावर राहील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.

या संदर्भात संबंधित निवेदनाची प्रत आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, आर्णी-केळापूरचे आमदार राजू तोडसाम, जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक तसेच इतर संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे.

उमेदवारांनी प्रशासनाने सकारात्मक निर्णय घेऊन उपोषणाची वेळ येऊ न देण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...