अंतुर्ली येथे अखिल भारतीय श्री हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्टतर्फे आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न

  अंतुर्ली येथे अखिल भारतीय श्री हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्टतर्फे आरोग्य तपासणी शिबीर उत्साहात संपन्न



मुक्ताईनगर प्रतिनिधी : किरण पाटील


मुक्ताईनगर तालुक्यातील अंतुर्ली येथे अखिल भारतीय श्री हॉस्पिटल अँड मेडिकल ट्रस्टच्या वतीने एक दिवसीय मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तसेच परमपूज्य गुरुमाऊली यांच्या मार्गदर्शनाखाली आणि श्री चंद्रकांत दादासाहेब यांच्या आदेशाने हे शिबिर पार पडले.



या आरोग्य शिबिरात गावातील सुमारे ९० नागरिकांनी सहभाग नोंदवत विविध आजारांची तपासणी करून घेतली. गुरुपीठातील तज्ज्ञ डॉक्टर डॉ. चारूशीला आणि डॉ. सायली तेरे यांनी उपस्थित रुग्णांची तपासणी करून आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन केले.



कार्यक्रमाची सुरुवात कृषिरत्न दिनेश पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी व्ही. एम. पंडित, पु. सु. धायले, भागवत खडसे, फकिरा दवंगे, संतोष पाटील, प्रकाश सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.तसेच प्रा. के. वाय. चौधरी, दीपक पाटील, बबलू वराडे, निलेश सोनवणे, जे. डी. चौधरी, सुधीर कुलकर्णी आणि प्रदीप तराळ यांनी ग्रामस्तरावर जनजागृती करून शिबिराच्या यशस्वीतेसाठी विशेष परिश्रम घेतले.या उपक्रमामुळे गावातील नागरिकांना आपल्या गावातच आरोग्य तपासणीची सुविधा उपलब्ध झाल्याने समाधान व्यक्त करण्यात आले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...