आर्णीजवळ अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू

 आर्णीजवळ अज्ञात वाहनाची धडक; दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू


आर्णी : खडका येथील रहिवासी अंकित रविंद्र राऊत (वय 28) यांचा 15 एप्रिल 2026 रोजी उशिरा रात्री झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झाला. अंकित हे दुचाकीने यवतमाळकडे जात असताना आर्णी जवळील महामार्गावर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

ही घटना रात्री सुमारे 12 ते 1 वाजण्याच्या दरम्यान दिग्रस रोडवरील उड्डाण पुलाजवळ घडली. या अपघातात दुचाकी पूर्णपणे चकनाचूर झाली असून अंकित यांच्या चेहऱ्यावर व माथ्यावर गंभीर दुखापत झाली. त्यामुळे त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघातानंतर काही वेळातच स्थानिक नागरिक व पोलिसांनी अंकित यांना आर्णी ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.मृत अंकित राऊत हे यवतमाळ येथील इंडसइंड बँकेत कार्यरत होते.


सुट्टी असल्यामुळे ते घरी खडका येथे आले होते. रात्री ते दुचाकी (क्र. MH 29-BO-8782) वरून यवतमाळकडे निघाले असताना हा अपघात घडला.या प्रकरणी स्वप्नील अनिल रावते (वय 38, रा. आर्णी) यांनी आर्णी पोलिस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.अंकित अविवाहित असून त्यांच्या पश्चात आई-वडील व एक लहान भाऊ असा परिवार आहे.

कुटुंबाचा मुख्य व्यवसाय शेती असल्याची माहिती मिळाली आहे. बातमी लिहेपर्यंत शवविच्छेदन प्रक्रिया सुरू होती. अंत्यसंस्कार खडका येथे करण्यात येणार आहेत. अशी माहिती मिळाली. पुढील तपास पोलिस निरीक्षक नीलेश सुरडकर यांच्या मार्गदर्शनाखाली अतुल पवार व राजू रुद्राक्षवार यांनी पुढील कार्यवाही सुरू ठेवली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...