जवळा येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती उत्साहात साजरी
आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार
जवळा येथील बोधिसत्व बुद्धविहारात भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३५ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात समाज मंदिराजवळील महात्मा ज्योतिबा फुले व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून अभिवादनाने झाली.यानंतर गावातील भीमसैनिकांनी उत्साहात रॅली काढून परिसरात जयंतीचा संदेश दिला. पुढे बोधिसत्व बुद्धविहारात डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. ऑटो संघटनेचे आयु. नितीन मुजमुले यांनी हार अर्पण करून अभिवादन केले, तर भिमराव मुजमुले सर यांनीही पूजन करून उपस्थितांना मार्गदर्शनपर विचार मांडले.
कार्यक्रमादरम्यान आयु. रामटेके सर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित हस्ताक्षर स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धेत प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे कुमार राऊत, कु. उके व कु. खुशी थोरात यांनी पटकावले. विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली.या प्रसंगी भिमराव मुजमुले, अमोल मुजमुले, विकी रोहिले, दिनकर गजभिये, खुशाल बडवाईक, किशोर मुजमुले, विनोद मुजमुले, राजू मुजमुले, राजेश मुजमुले, बाळू घाटोडे, सुरज उके, अरविंद मुजमुले, देविदास गेडे, माया मुजमुले, निर्मलाबाई मुजमुले, अनुसयाबाई कुडवे, सुमित्राबाई वानखेडे, इंदुबाई राजुरे, प्रमिला रौराळे, चिंधाबाई उके, भारती उके, गयाबाई मुजमुले, राणी मुजमुले, मीना मुजमुले, रुपाली प्रघाने, वंदना घाटोडे आदींसह बौद्ध बांधव, उपासक-उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होते.कार्यक्रमाचा समारोप त्रिशरण पंचशील व भीमस्तुतीने तसेच जयघोषात करण्यात आला.

टिप्पणी पोस्ट करा