चोरी करणारे दोन इसमांना ताब्यात घेवुन २१ लाखाचा मुददेमाल जप्त करुन घरफोडी केली उघड स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांची कारवाई

 चोरी करणारे दोन इसमांना ताब्यात घेवुन २१ लाखाचा मुददेमाल जप्त करुन घरफोडी केली उघड स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांची कारवाई



ता.प्र.

यवतमाळ जिल्हातील वाढत्या घरफोडीचे प्रमाण पाहता मा, पोलीस अधिक्षक यवतमाळ, यांनी गुन्हे उघडकिस आनण्याच्या सुचना स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांना दिल्या होत्या त्या नुसार स्थानिक गुन्हे शाखा पथक वणी पांढरकवडा गुन्हा उघड करणेसाठी पोलीस स्टेशन वणी हददीतील चोरीचे गुन्हयाबाबत प्रयन्त करीत असतांना दिंनाक २०/०४/२०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ हे पोलीस स्टेशन मारेगाव येथे फिर्यादी नामे सुशिल जगेंवार रा. मारेगाव यानी दिनांक ०७/०४/२०२६ रोजी प्रत्यक्ष पोलीस स्टेशल ला येवुन जबानी रिपोट 'दिला कि, त्याचे राहते घरी कोनीतरी अज्ञात ईसमानी सोन्या, चांदीचे दागिने चोरुन नेले आहे. अश्या फिर्यादीचे रिपोर्ट वरुन पोलीस स्टेशन मारेगाव येथे अपराध क्रमांक १४२/२०२६ कलम ३०३ (A) भा.न्या.स. प्रमाणे दाखल आहे.



वरुन सदर गुन्हयाचा समातंर तपास करीता असतांना उपविभाग वणी स्थागुशा. पथकास खात्रीलायक खबर मिळाली कि, दोन विधीसंगर्षग्रस्त बालकाने सदर चोरी केली असुन पुसद येथिल आरोपीचे मार्फतीने चोरी केलेले सोन्या चांदीचे दागिने उमरखेड येथिल सराफा व्यावसाईकास विक्री केले आहे. अश्या माहिती वरुन क्षनाचा विलंब नकरता वणी/पांढरकवडा विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी तात्काळ सदर दोन्ही विधीसंगर्षग्रस्त बालकास ताब्यात घेवुन त्याना विचारपुस केली असता सदर विधीसंगर्षग्रस्त बालकाने चोरी केल्याची कबुली देवुन आरोपी नामे नथ्थु कुरकुटे व दत्ता कुरकुटे रा. नागवाडी ता. पुसद जि. यवतमाळ यांचे मार्फतीने सोने व चांदीचे दागिण्याची विक्री केली आहे. अश्या माहिती वरुन पुसद येथे रवाना होवुन पुसद विभागातीन स्था.गु.शा. अधिकारी व कर्मचारी यांचे मदतिने गुन्हयात चोरी गेलेला १०० टक्के मुददेमाल वेगवेगळ्या प्रकारचे सोने चांदीचे दागिने एकुण किमंत २१,३७,७७१/-रुपयाचा मुददेमाल जप्त करुन आरोपी दत्ता सटवाजी कुरकुटे रा. नागवाडी ता. पुसद यास ताब्यात घेवुन पुढील कारवाई कामी पोलीस स्टेशन मारेगाव यांचे ताब्यात देण्यात आले आहे.



सदरची कारवाई ही मा, पोलीस अधिक्षक श्री कुमार चिता, अप्पर पोलीस अधिक्षक श्री अशोक थोरात, यवतमाळ पुसद उपविभागिय पोलीस अधिकारी श्री हर्षवर्धन बिजे, पोनी सतिश चवरे स्था.गु.शा. यवतमाळ, यांचे मार्गदर्शनात सपोनि दत्ता पेंडकर, सपोनि धिरज बांडे, पोलीस उपनिरीक्षक धनराज हाके, शरद लोहकर, सफौ/मुन्ना आडे, पोहवा/सतोंष भोरगे, पोहवा/सुनिल खंडागळे, सुधिर पांडे, निलेश निमकर, सुधिर पिदुरकर, तेजाब रनखांब, सुभाष जाधव, कुनाल मुडेकार, रमेश राठोड, पोका / सलमान शेख, रजनिकांत मडावी, सुनिल पंडागळे, राजेश जाधव, चापोउपनि. रविंद्र श्रिरामे, चापोना सतिश फुके सर्व स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांनी यशस्वीरित्या पार पाडली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...