आर्णीत विराट हिंदू संमेलनाचे आयोजन

 आर्णीत विराट हिंदू संमेलनाचे आयोजन 

आर्णी तालुका प्रतिनिधी गणेश एकंडवार 
आर्णी :धर्म जागरणाच्या दिशेने नविन ऊर्जा व चेतना निर्माण करण्याच्या उद्देशाने हिंदू सुरक्षा सेवा संघ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने आर्णीत रविवार दि. २६ एप्रिल रोजी दुपारी ४ वाजता विराट हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे.

  यादरम्यान रविवारला दुपारी भव्य मिरवणूक शोभा यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे, तसेच दुसऱ्या सत्रात सायंकाळी ६ वाजता धर्मसभा होइल या जाहिर सभेचे आयोजन शहरातील श्री. म. द भारती मैदान शिवनेरी चौक येथे आयोजित करण्यात आले आहे. राष्ट्रीय अध्यक्ष हिंदू सम्राट श्री श्री 1008 महंत राजुदासजी महाराज सिद्ध पीठ हनुमान गडी अयोध्या धाम उत्तर प्रदेश यांची प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थिती राहणार आहे.तर वर्धा चे अटल पांडे यांचे ही व्याख्यान होईल। 


 या धर्श्रीम संमेलना साठी सुनिलजी महाराज हिंदू सुरक्षा सेवा संघ प्रदेश प्रभारी महाराष्ट्र, महंत बालयोगी गोपालनाथजी प्रदेशाध्यक्ष संत प्रकोष्ठ मठाधिपती रतनगढ, श्री शामसुंदर भारती उपाध्यक्ष संत प्रकोष्ठ महाराष्ट्र तथा आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष जुना अखाडा, संदिप वाकडे जिलाध्यक्ष हिंदु सुरक्षा सेवा संघ हिंगोली तथा महामंत्री महाराष्ट्र यावेळी श्री संत सदगुरु गंगेश्वर बापू (मदनापुर किनवट), श्री श्री श्री १००८ श्री महंत जानेश्वर भारती महाराज (भारती आश्रम श्रीक्षेत्र माहूर), श्री.संत सावरिया बाबा मठाधिश बालाजी मंदिर यवतमाळ,श्री संत बाबुसिंग महाराज (बंजारा समाज विधान परिषद आमदार (पोहरादेवी),श्री ष. ब्र 108 वेदांनचार्य सद्‌गुरू दिगांबर महाराज (शिवाचार्य स्वामीजी भोरला मठ संस्थान वसमत), श्री ष. ब्र 108 सद्गुरु सिद्धचैतन्य शिवाचार्य महाराज (साखरखेडा , बुलढाणा) महाराज, श्री. ष.ब्र. १०८ सदगुरु शिव चैतन्य शिवाचार्य महाराज (श्री महोदव भठ संस्थान हदगाव), श्री.प.ग्र 108 विश्वचैतन्य शिवाचार्य महाराज जालना,श्री.प. ब्र १०८ गुरुपादेश्वर शिवाचार्य: (गिरगाव) महाराज, श्री ष.ब्र. 198 श्री. सद्योजात शिवाचार्य महाराज (शिवयोगी जिर्वानी मठ संस्थान नागठाणा) श्री. प. ब्राक्रसदगुरु काशिनाथ शिवाचार्य महाराज (पाथरी परभणी), महंत श्री.जितेंद्र महाराज (पोहरादेवी), महंत रामराव महाराज यांचे उत्तराधिकारी शेखर महाराज


(पोहरादेवी),संत अंबिका भारती आई (बोपापुर, वर्धा) यांच्यासह साधुसंत महंत, योगी, साधक, सामाजिक क्षेत्रातील तसेच राजकीय क्षेत्रातील लोकनेते तसेच समाजसेवक, महाराष्ट्र राज्यातील हिंदू सुरक्षा सेवक संघाचे पदाधिकारी, विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, तसेच हिंदू सनातन संघटनेचे कार्यकर्ते सह नागरिकांनीउपस्थित राहणार आहे.या धर्मसभेला जास्तित जास्त नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन आयोजक गजानन सागरबाई रामचंद्र केने महाराज संत प्रकोष्ठ विदर्भ प्रांत महा मंत्री आर्णी व आर्णि वासियांनी केले आहे।

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...