यवतमाळमध्ये ५ किलो वजनाची अंडाशयातील मोठी गाठ यशस्वीरीत्या काढण्यात यश
यवतमाळमध्ये अत्यंत कौशल्यपूर्ण शस्त्रक्रियेद्वारे ५ किलो वजनाची अंडाशयातील मोठी गाठ (ओव्हेरियन मास) यशस्वीरीत्या काढण्यात आली. ही शस्त्रक्रिया यवतमाळ येथील कॅन्सर रोग शस्त्रक्रिया तज्ञ ( सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट ) डॉ. ऋषिकेश निलपवार आणि त्यांच्या कुशल वैद्यकीय टीमने दत्त हॉस्पिटल येथे अत्यंत अचूकतेने आणि काळजीपूर्वक २४ एप्रिल २०२६ रोजी पूर्ण केली.
रुग्णाला गेल्या काही दिवसांपासून पोट फुगणे, जडपणा आणि अस्वस्थता जाणवत होती. तपासणीनंतर तिच्या अंडाशयामध्ये मोठ्या आकाराची गाठ असल्याचे निदान झाले. गाठीचा मोठा आकार आणि त्यातील गुंतागुंत लक्षात घेता शस्त्रक्रियेसाठी विशेष नियोजन आणि तज्ज्ञांची आवश्यकता होती.ही शस्त्रक्रिया दत्त हॉस्पिटल येथे यशस्वीरीत्या पार पडली. गाठ पूर्णपणे काढण्यात आली असून आजूबाजूच्या महत्त्वाच्या अवयवांचे संरक्षण करण्यात आले. मोठ्या आकारामुळे निर्माण झालेल्या आव्हानांवर मात करत ही शस्त्रक्रिया अत्यंत सुरक्षित आणि अचूक पद्धतीने करण्यात आली.
या यशस्वी शस्त्रक्रियेमध्ये यवतमाळ येथील कॅन्सर रोग शस्त्रक्रिया तज्ञ डॉ. ऋषिकेश निलपवार , भूलतज्ज्ञ डॉ. शितल मानकर यांनी अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावली. तसेच शस्त्रक्रिया टीममधील शस्त्रक्रियागार सहायक विराज, नितेश ब्रदर आणि वृचिका, सोनाली सिस्टर आणि संपूर्ण ऑपरेशन थिएटर स्टाफ यांनी समन्वयाने आणि एकजुटीने काम करत ही शस्त्रक्रिया यशस्वी केली.रुग्णांच्या सेवेसाठी डॉ. ऋषिकेश निलपवार यवतमाळ येथे २४ तास उपलब्ध असून, कोणत्याही आपत्कालीन किंवा कॅन्सर संबंधित आणि शरीरातील गाठींच्या समस्यांसाठी तत्काळ मार्गदर्शन व उपचार दिले जातात.
या प्रसंगी डॉ. निलपवार यांनी सांगितले की, “ही केवळ एका डॉक्टरची नाही तर संपूर्ण टीमच्या एकत्रित प्रयत्नांची फलश्रुती आहे. प्रत्येक सदस्याने आपली जबाबदारी अत्यंत प्रामाणिकपणे आणि कौशल्याने पार पाडली. अशा टीमवर्कमुळेच जटिल शस्त्रक्रिया सुरक्षितपणे आणि यशस्वीरीत्या पूर्ण होऊ शकतात.”डॉ. निलपवार यांनी पुढे सांगितले की, “अशा प्रकारच्या मोठ्या गाठी वेळेवर ओळखून उपचार केल्यास यशस्वीरीत्या व्यवस्थापित करता येतात. आता यवतमाळसारख्या ठिकाणीही प्रगत शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध होत असल्याने रुग्णांना मोठ्या शहरांमध्ये जाण्याची गरज कमी होत आहे.”
ही यशस्वी शस्त्रक्रिया म्हणजे यवतमाळमध्ये उपलब्ध होत असलेल्या आधुनिक वैद्यकीय सुविधांचा आणि तज्ज्ञांच्या एकत्रित प्रयत्नांचा उत्तम नमुना आहे. दत्त हॉस्पिटल कडून रुग्णांना उच्च दर्जाची, सुरक्षित आणि रुग्णकेंद्रित आरोग्यसेवा देण्याची वचनबद्धता यामुळे पुन्हा अधोरेखित झाली आहे.




टिप्पणी पोस्ट करा