35 नेत्र रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी

 35 नेत्र रुग्णावर मोतीबिंदू शस्त्रक्रिया यशस्वी 


यवतमाळ :- सामाजिक बांधिलकी जोपासून चंदन राठोड, चंद्रकांत बंडे व राजू इंगोले यांनी आयोजित केलेल्या शिबिरातील आबाल वृद्धांच्या नेत्र रुग्णावर यवतमाळ येथील आयुर्वेदिक रुग्णालयामध्ये नेत्र तज्ञ डॉ.मनोज तगडपल्लीवार, डॉ.प्रशांत चव्हाण व डॉ.स्मिता चव्हाण यांनी मोतीबिंदू असलेल्या 29 नेत्र रुग्णावर यशस्वी शस्त्रक्रिया केले. ग्रा.पं. कार्यालय लोणबेहळ अंतर्गत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज यांच्या द्वारे स्व.वामनराव गावंडे , स्व. रामदासजी बंडे, स्व. प्रयागबाई बंडे, स्व. सिमाबाई राऊत आणि स्व. सावित्रीबाई जाधव यांच्या स्मृती प्रित्यर्थ शिबिराचे आयोजन करून नेत्र रुग्णाची सदर शिबिरात निवड करण्यात आली होती.


शिबिरा दरम्यान निवड झालेल्या रुग्णाच्या डोळ्याची डॉ.जयंत वाघ यांनी काळजी पूर्वक तपासणी असून यवतमाळ येथील आयुर्वेदिक रुग्णालयात भरती करून मोतीबिंदू शस्त्रक्रिया करून घेण्यात आली. शस्त्रक्रिया करण्यात आलेल्या नेत्र रुग्णाची तपासणी डॉ.शंतनु गावंडे यांनी केले. यावेळी नेत्र चिकित्सा अधिकारी सुहास कान्हव, सुनील नागपुरे, राजश्री सीडाम, नंदा शेरजे, चेतन सरोदे, बंडू गजभे यांनी नेत्र रुग्णांच्या डोळ्यांचे ड्रेसिंग केले असून सोनाली घायवान यांनी रुग्णांना नेत्र विषयी समुपदेशन केले. ड्रेसिंग संपल्यानंतर सर्व मोतीबिंदू शस्त्रक्रिया झालेल्या नेत्र रुग्णांचा सन्मान करण्यात आले.

यावेळी आबाल वृद्धांना आर्णी येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. रमा बाजोरिया व संजय जोशी , चंदन राठोड चंद्रकांत बंडे , रवी ढाकूलकर, करमसिंग राठोड, प्रद्युम्न राठोड यांनी रुग्णांना दूध, बिस्किट व फळ फ्रूट वाटप करण्यात आले. या शस्त्रक्रिया कार्यक्रमा दरम्यान संजय जोशी यांनी सेवा है यज्ञ कुंड समिधा सम हम जले ! ध्येय महा सागर मे सरित रूप हम मिले ! लोक योग क्षेम ही राष्ट्र अभय गान है ! सेवारत व्यक्ती व्यक्ती कार्य का ही प्राण है ! या सेवा गिताच्या माध्यमातून सर्व रुग्ण सेवेचे महत्त्व सांगून या कार्यक्रमाचे समारोप करण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक परिचय यांनी करून दिला. कार्यक्रमाचे आभार संजय जोशी यांनी मानले. 

गेल्या वीस वर्षापासून ग्रामीण भागात अबाल वृद्धांकरिता सतत नेत्र शिबिराचे आयोजन करून जिवंत माणसात देव पाहण्याचे काम चंदन राठोड, चंद्रकांत बंडे व राजू इंगोले हेकरित आहे.आज यांच्या माध्यमातून मला आपली सेवा करण्याची संधी मिळाल्यामुळे मी माझं भाग्य समजते असे चांगले कार्य यांच्या हातून पुन्हा पुन्हा घडो यांच्या कार्याला माझा सलाम आहे. :- 

डॉ. रमा बाजोरिया 

वैद्यकीय अधीक्षक ग्रा.रू.आर्णी

.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...