भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार जवळा:
आर्णी तालुक्यातील जवळा सर्वात मोठी असलेली ग्रामपंचायत जवळा येथे आर्णी तालुक्यातील सर्वात मोठा बाजार भरतो. या परिसरात 15 ते 20 खेड्यातील लोक बाजार करण्यासाठी जवळा या गावाला येतात. सदर बाजार हा रात्री नऊ वाजेपर्यंत चालू असतो. बाजारात यापूर्वी हायमॅक्स लाईट लावून व्यवस्था करण्यात आली होती. परंतु दुर्दैवाने मागील 8ते9 महिन्यापासून हाय मॅक्स लाईट बंद पडलेला आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना व बाजारात येणाऱ्या ग्राहकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. ग्रामपंचायत आठवडी बाजाराचा छोट्या-मोठ्या व्यापाऱ्याकडून बाजारकर वसुलीच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात नियमित कर वसुली करण्यात येते. या बाजारापासून ग्रामपंचायतीला उत्पन्न मिळत असूनही बाजारातील सोयीसुविधा पुरविण्यास ग्रामपंचायत असमर्थ ठरली आहे. तरी लवकरात लवकर हायमॅक्स लाईट दुरुस्ती करावी अशी व्यापाऱ्याची व गावकऱ्यांची मागणी आहे.

टिप्पणी पोस्ट करा