पिकविम्याच्या तक्रारीला 9 महिने लोटले तरीही मदत देण्यास टाळाटाळ



# लोणी येथील शेतकऱ्यांची सोयाबीन पिकाची तक्रार

# आर्णी तालुक्यात पिकविमा कंपनीची मनमानी

  

गेल्या खरीप हंगामातील पिके काढणीस आली असताना आक्टोंबर महिन्यात परतीच्या पावसाने पिकांचे नुकसान झाले. यामध्ये सोयाबीन ,कापूस ,उडीद ,मुग पिकांचे पावसाने भिजल्याने  मोठ्या प्रमाणावर  नुकसान झाले. ज्या शेतकऱ्यांनी  पिकविमा उतरविला अशा शेतकऱ्यांनी ७२तासाच्या आत तक्रारी केल्या तर पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत दिली जाते .  अशातच आर्णी तालुक्यातील लोणी येथील शेतकऱ्यांनी  पिकविम्याच्या तक्रारी करून आता 9 महिने लोटले तरी अद्याप पर्यंत त्यांना मदत मिळाली नसल्याची बाब समोर आली. पिकविम्याची तात्काळ मदत देण्याची तरतूद असताना 9 महिन्यापासून मदत देण्यास पिकविमा कंपनी कडून टाळाटाळ करीत     असल्याने शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त केला जात आहे.  

 गेल्या खरीप हंगामातील   पिकांचा ज्या शेतकऱ्यांनी  पिकविमा उतरविला  होता अशांना पिकाच्या नुकसान भरपाई मिळण्यासाठी ७२ तासाच्या आत आँनलाईन तक्रार दाखल करण्याच्या सुचना दिल्या  होत्या. ज्यांना आँनलाईन करणे जमले नाही अशा शेतकऱ्यांनी तालुका कुषी कार्यालयात लेखी स्वरूपात तक्रारी करण्याचे सुचित करण्यात आले होते. तक्रारी दाखल झालेल्या शेतकऱ्यांशी तालुक्यातील संबंधित विमा कंपनीच्या समन्वयकांनी संपर्क साधून  नुकसानग्रस्त पिकाचा पंचनामा करून गेले असे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी सांगितले.  पिकविमा कंपनी कडून तात्काळ मदत दिली जाईल असे तेव्हा शासनाने जारी केले होते. असे असताना  मात्र आर्णी तालुक्यातील  लोणी येथील  शेतकऱ्यांनी पिकविमा कंपनीकडे आँनलाईन तक्रार दाखल केल्या होत्या. त्यापैकी काही शेतकऱ्यांनी तक्रार  करून आता जवळपास 9 महिने लोटली असताना सुद्धा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची तात्काळ मदत अद्याप पर्यंत देण्यासाठी प्रयत्न झाले नसल्याने समोर आल्याने शेतकऱ्यांचा पिकविमा कंपनीवर असलेला विश्वास उडाला आहे.  लोणी येथे जवळपास १० ते १२ शेतकऱ्यांना हा लाभ मिळाला नसल्याचे सांगितले जाते .  त्यांच्या शेतात पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याचे  पंचनामे सुद्धा करण्यात आले असे शेतकरी सांगतात तर तात्काळ दिली जाणारी मदत 9महीने लोटले असताना सुद्धा मदत दिली नसल्याने पिकविमा कंपनीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह लागले आहे. पिकविमा कंपनीचा मनमानी कारभार सुरु असल्याचा आरोप ही या शेतकऱ्यांनी केला आहे.

#######'''####''###############

 लाभ नाही मिळाला तर मग पुन्हा पिकविमा भरायचा कशाला असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले असताना पिकविमा कंपनीकडून  अनेक शेतकऱ्यांना  एकरी हजार ते दोन हजार रुपये अशी ही मदत मिळाली आहे. नुकसान झाले त्या तुलनेने ही मदत खुप कमी आहे. आता ज्यांना पिकविमा मिळाला नाही त्यांनी पुन्हा पिक विमा काढायला  नकार दिला आहे. एकंदरीत पिकविमा कंपनीने शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक केली असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...