जवळा परिसरात चोरट्याचा धुमाकूळ



तालुक्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या जवळा गावामध्ये पोलीस चौकी असताना सुद्धा चोरट्यांनी धुमाकूळ घातला आहे. तसेच जवळा परिसरात सुद्धा लहान सहान चोरी च्या घटना नियमित घडत असताना काल रात्री 3 जुन च्या मध्यरात्री गावातील मुख्य रस्त्यावरील पद्मावार ज्वेलर्स अज्ञात चोरट्यांनी फोडल्याने  गावात भीतीचे वातावरण पसरले आहे. परिसरातील अनेक गावात शेती उपयोगी वस्तू, जनावरे, ट्रॅक्टरच्या बॅटरी इत्यादी चोरीच्या घटना वारंवार घडत असताना सुद्धा आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या जवळा पोलीस चौकी येथील  जवळा परिसरात चोरांचे चांगलेच फावते आहे. तसेच अनेक चोरीच्या घटनांचा तपासही पूर्णपणे झाला नसल्याने. परिसरात पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्या जात आहे. जवळा येथील चौकीत अनेकदा पोलीसच गैरहजर असल्याचे निदर्शनास येत आहे. तसेच रात्रपाळीत कोणीही हजर राहत नसल्याने अशा घटना घडत असल्याचे नागरिकांतून बोलल्या जात आहे. वरिष्ठांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन गावातील चोरीच्या घटनांना आळा घालावा अशी अपेक्षा गावकऱ्यांनी व्यक्त केली आहे. घटनेचा पुढील तपास फिंगरप्रिंट एक्स्पर्ट ची टीम पाचरण  केली असता चोरट्याच्या हातात कोणताही मुद्देमाल मिळाला नसल्याने सांगितले जात आहे. अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद करून पुढील  तपास संजय भारती अरुण पवार करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...