ध्येय वेड्या तरुणांनी उचलला स्मशानभूमी सौंदरीकरणाचा विडा

लोकसहभागातून करणार महादेव मूर्तीची स्थापना. तालुक्यातील जवळा येथील स्मशानभूमीची अवस्था दयनीय झाली आहे संपूर्ण स्मशानभूमीत गवत वाढले आहे पाण्याचे बोर असून वेळेवर पाणी मिळत नाही हाय मास्टलाईट बसवला असून तो सुद्धा बंद राहतो याकडे स्थानिक ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष होत असल्यामुळे जवळा येथील छत्रपती शिवजयंती उत्सव समिती व श्री रामनवमी उत्सव समिती तसेच बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी एकत्रित येऊन स्मशानभूमी सौंदर्यकरणाचा विडा उचलला आहे.
येत्या काळात संपूर्ण स्मशानभूमी लोकसहभागातून सुंदर व सर्व सोयीसुविधा उपलब्ध करण्याची संकल्पना या तरुणांनी केली आहे. सर्व प्रथम वृक्ष संवर्धन दिनानिमित्त वृक्ष लागवड करून या आगळ्या वेगळ्या कार्याची सुरुवात करण्यात आली व त्वरित स्मशानभूमीतील गवतावर तणनाशक फवारणी केली.
येत्या काळात संपूर्ण स्मशानभूमीत सिमेंटचे बाकडे,वृक्ष लागवड करून टी गार्ड बसविणे,लाईटची व्यवस्था,पिण्याचे स्वच्छ पाणी,वृक्षांना ड्रिप द्वारे पाणी पुरवठा करून वृक्ष संगोपन करणे व स्मशानभूमीत गावकऱ्यांच्या मदतीने शंकरजीची मूर्ती ध्यान अवस्थेत बसविणार असल्याचे यावेळी सर्व छत्रपती शिवाजी उत्सव समिती व श्री रामनवमी उत्सव समिती व बजरंग दल च्या कार्यकर्त्यांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...