जवळा येथे सावता परिषद यवतमाळ जिल्हाध्यक्ष अमोल ठक यांच्या दुकान समोर सावता महाराज यांच्या फोटो ला हार व पुष्प अर्पण करून पूजा करण्यात आली. यावेळी श्री. मांडवगडे सर यांनी उपस्थित मान्यवरांना श्री संत सावता महाराज यांच्या विज्ञानवादी कार्याची, थोडक्यात माहिती दिली.. महाराज सांगत पंढरीची वारी केली, तरच आपल्याला विठ्ठल भेटेल असं नाही. ते आपलं घर, आपला परिवार, आपली शेतीवाडी, सांभाळून आपल्या चांगल्या कर्मात, आपल्या चांगल्या कर्तृत्वात,ही भेटू शकतो, जसे *।।कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी।।* असे म्हणत ते कधीच पंढरीला गेले नाहीत. पण आजही पंढरीची आषाढी एकादशीची यात्रा संपली की. त्यांच्या आरण या गावी विठ्ठलाची पालखी येते. अशा या थोर संत शिरोमणी सावता महाराजांना सर्व समाज बांधवांनी पूजा केली. त्यावेळी मोठ्या संख्येने गावातील प्रतिष्ठित नागरिकांची उपस्थिती व समाज बांधवांची उपस्थिती होती.
जवळा येथे श्री संत शिरोमणी सावतामाळी पुण्यतिथी उत्साहात साजरी
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा