शेलु फाट्याजवळ चारचाकी वाहन दुभाजकावर आदळले
नागपूर तुळजापूर महामार्गावरील घटना
नागपूर तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावर जवळा गावापासून दोन किमी अंतरावर असलेल्या शेलु फाट्या नजीक चारचाकी वाहन रस्ता दुभाजकावर आदळल्याने अपघात झाला. सुदैवाने या अपघातात जीवीतहानी झाली नाही.
६ जुलै रोजी सकाळी ८ वाजता दरम्यान गाडी नंबर MH36 H7207 ही भंडारा वरून नांदेड येथे जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे भरधाव गाडी रस्ता दुभाजकावर आदळल्याने गाडीचा समोरील चाक निखळले पडले. त्यामध्ये गाडीमध्ये असलेले दोन प्रवासी
सोनाली कुमठेकर वय (४१) आणि कुमठेकर वय ( ४३) हे दाम्पत्य सुदैवाने बचावले. सदर चारचाकी वाहन रस्त्याच्या दुभाजकावर चढल्याने महामार्गावर काही वेळ वाहतूक खोळंबली होती. अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिस दाखल झाले.

टिप्पणी पोस्ट करा