खाजगीशाळेमध्ये होणारी शुल्क वाढ कमी करण्यासाठी म न से चे तहसीलदारांना निवेदन



भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार 

आर्णी शहरांमध्ये तसेच तालुक्यांमध्ये खाजगी इंग्लिश शाळेचे प्रमाण वाढलेले आहे. त्याचप्रमाणे शुल्क वाढलेली आहे. यावर  कोणतेही नियंत्रण नसल्याने या संस्थेचे मालक मनमानी कारभार चालू आहे. याकडे शिक्षण विभागाच्या दुर्लक्ष होत आहे. शासन नियमा नुसार प्रत्येक शाळेमध्ये नियंत्रण शुल्क समिती स्थापन करणे अनिवार्य आहे. हे कुठेही समिती दिसत नाही. त्यामुळे पालकांना आर्थिक समस्येला तोंड द्यावे लागत आहे. हे कूठे तरी थांबलं पाहिजे या उद्देशाने मनसेच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यावेळी उपस्थित-महाराष्ट्र नवनिर्माण सेना निखिल बोक्से,सचिन यलगंधेवार,कपिल ठाकरे,किशोर बोक्से,अजय पिकलमूंडे,दिपक बोरकर,निलेश बोक्से,मनोज माहूरवार आदी सदस्य उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...