आर्णी येथे भव्य महिला मेळावा संपन्न


भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी गणेश एकंडवार
आर्णी येथे कॉंग्रेस कमेटी, महिला कॉंग्रेस, युवक काँग्रेस यांच्यावतीने तिर्थरूप मंगलकार्यालय येथे महिला मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार बाळुभाऊ धानोरकर, उदघाटक माजीमंत्री अँड. शिवाजीराव मोघे तर प्रमुख पाहुणे म्हणून वरोरा - भद्रावती मतदार संघाच्या आमदार प्रतिभा धानोरकर, प्रदेशाध्यक्षा महिला काँग्रेस कमिटीच्या संध्याताई सव्वालाखे, महिला कॉंग्रेस कमिटीच्या जिल्हाध्यक्षा वंदना आवारी, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष मनिष पाटील हे होते. तर व्यासपीठावर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा माधुरी आडे, जिल्हा सदस्या स्वाती येंडे, किरण मोघे, पंचायत समितीचे सदस्या ज्योती उपाध्ये, सविता राठोड हे उपस्थित होते.
        या कार्यक्रमाचे प्रास्ताविक साजिद बेग यांनी केले. त्यानंतर जितेंद्र मोघे, वंदना आवारी, संध्याताई सव्वालाखे, मनिष पाटील, आमदार प्रतिभा धानोरकर, अँड. शिवाजीराव मोघे यांचे मनोगत झाले.शेवटी अध्यक्षीय मार्गदर्शन खासदार बाळुभाऊ धानोरकर यांचे झाले. त्यांनी सांगितले की महिलांनी चुल आणि मुल एवढच काम न ठेवता जगात काय चालु आहे हे आपणास समजल पाहिजे.. यासाठी पेपर वाचला पाहिजे. टिव्हीवरच्या बातम्या पाहिल्या पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला जगातील माहीती मिळेल. गोरगरीब, शेतकरी यांना न्याय देण्याचे काम काँग्रेसने केले बेरोजगारांना नौकऱ्या दिल्या. मात्र भाजपच्या काळात युवकाच्या हातात काम नसल्याने मोठ्या प्रमाणात बेकारी वाढली आहे. महिलांनी स्वताला कमजोर समजु नका. महिलांनी बाहेर निघुन निवडणूक लढविण्यासाठी तयारी केली पाहिजे. जोमाने उठा कामाला लागा. असे खासदार बाळू धानोरकर यांनी सांगितले. 
     या कार्यक्रमाचे संचालन कैलास राऊत यांनी केले तर आभार प्रदर्शन छोटु देशमुख यांनी केले. या कार्यक्रमाला शारदा शिंदे, निता ठाकरे, प्रणिता देशमुख, शालिनी विरखेडे,निलोफर बेग, अनिता भगत, ज्योती अरणकर, प्रिया वारंगे, सुषमा सुरटकर, सुमित्रा जाधव, मंदा भगत, वंदना गावंडे, ज्योती मोरकर, साजीद बेग, आरीज बेग, सुनिल भारती, राजु विरखेडे, छोटु देशमुख, अनिल आडे, अन्वर पठाण, खुशाल ठाकरे, राजु गावंडे, संजय राऊत,कादर इसाणी, नरेश राठोड, अतुल देशमुख, विजय मोघे, रितेश बुटले, बाळासाहेब शिंदे, नांलदा भरणे, प्रदिप वानखडे, उमेश आचमवार, विनोद पंचभाई, निलेश आचमवार, विलास अगलदरे, अमोल वारंगे, प्रा. गिरीधर कुबडे, तारासिंग राठोड, रवि नाटकर, सतिश देवस्थळे, अंगत अरणकर, यांच्यासह आदी महिला मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...