आर्णी तालुक्यातील अतिवुष्टीमुळे पुरपरिस्थिती
अडाण नदीच्या पुराने नाल्याचा प्रवाह रोखला
गेल्या दोन दिवसापासून सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे आर्णी तालुक्यातील गणगाव लगत असलेल्या नदीला पूर आला यापुराच्या प्रवाहाने गणगाव येथील नाल्याचा प्रभाव रोखला त्यामुळे गणगाव नजीक असलेल्या पुलावरून पुराचे पाणी वाहत असल्याने हा मार्ग गेल्या 36 तासापासून गणगाव - तरोडा हा बंद असल्यामुळे गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचे बाहेर ठिकाणी ये जा करणे बंद आहे . दारव्हा तालुक्यातील अडाण प्रकल्पाचे दरवाजे उघडल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणावर विसर्ग होत आहे परिणामी अडाण नदी दुथडी भरून वाहत आहे. त्यामध्ये नदीला लागून असलेल्या नाल्यांचा प्रवाह रोखल्या जात असल्याचा अनुभव गणगाववाशीयांना नेहमीच येतो. असे असताना यावेळी मात्र पूर परिस्थिती अधिक प्रमाणात गंभीर झाली आहे कारण 36 तासापासून पूर उतरला नसल्याने काल सायंकाळपर्यंत हा मार्ग बंद होता. असे सरपंचांनी सांगितले. तसेच नाल्याचा प्रवाह रोखल्यामुळे पुराचे पाणी परिसरातील शेत शिवारात गेले त्यामुळे शेकडो एकर जमीन खरडून गेली तर अनेक शेतातील पिके पाण्याखाली आली आहेत. या गावात पूरपरिस्थिती ही नेहमीच राहत असल्याचे सरपंच संदीप खोडके यांनी सांगितले तर पुरपरिस्थिती गंभीर असताना कोणीही प्रशासकीय अधिकारी यांनी साधी विचारणा ही केली नसल्याने पुरपरिस्थिती विषयी प्रशासन उदासीन असल्याचे समोर आले आहे.
गेल्या 36 तासापासून गणगावचा संपर्क तुटला
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा