आर्णी येथे शांतता समितीची सभा

भगीरथ राजा 24 न्यूज प्रतिनिधी जवळा मोहरम, पोळा, गणेशोत्सव हे उत्सव शांततेत पार पाडण्यात यावे यासाठी आर्णी पोलीस स्टेशनच्या वतीने माहेर मंगल कार्यालयात शांतता समितीची सभा घेण्यात आली. या सभेचे अध्यक्ष अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. ए. के. धरणे, प्रमुख पाहुणे म्हणून विभागीय पोलीस अधिकारी दारव्हा येथील डॉ. आदित्य मिरखेलकर, तहसीलदार परशराम भोसले, माजी नगराध्यक्ष आरीज बेग हे होते.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक ठाणेदार पितांबर जाधव यांनी केले. त्यानंतर छोटु देशमुख, युनुस शेख, आरीज बेग, परसराम भोसले, डॉ. आदित्य मिरखेलकर यांचे मनोगत झाले. शेवटी अध्यक्षीय मनोगत अप्पर पोलीस अधीक्षक डॉ. ए. के. धरणे यांचे झाले. त्यांनी सांगितले की कोणाला हि जबरदस्तीने वर्गणी मागु नये. गणपतीउत्सव साजरा करण्यासाठी सार्वजनीक गणेश मंडळाने पोलीस स्टेशनकडुन परवानगी घ्यावी. उत्सव साजरा करताना उत्सवा दरम्यान सामाजिक उपक्रम राबविण्यात यांवे. गरजु मुलांना पुस्तके वाटप, रक्तदान शिबीर, वृक्षारोपण आदी उपक्रम घ्यावे. वर्गणीतून जमा केलेला पैसा समाज कार्यासाठी खर्च करा. डीझेवर बंदी आहे. चुकीची प्रथा बंद करा. पारंपारिक वाद्याच उपयोग मिरवणूक काढावी. कायद्याने पालन करा असे त्यांनी सांगितले.
या कार्यक्रमाचे संचालन प्रा. विनित माहूरे यांनी केले तर आभार प्रदर्शन पोलीस उपनिरीक्षक किशोर खंदार यांनी केले. या सभेला सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गणपतराव काळुसे,अरूण राठोड,रवि चव्हाण, कांतीलाल कोठारी, रियाज बेग, छोटु देशमुख, विठ्ठल देशमुख, विलास वातिले, विष्णू इंगोले, राजकुमार राठोड, राजु राठोड, सुरेश साखरकर, अशोक जाधव, विजय बुटले, अनिता तिवारी, अर्चना मत्पलवार, आरती राठोड, भाग्यश्री काळे, राजेश माहेश्वरी, राजेंद्र माहेश्वरी, श्रीकृष्ण जावळकर यांच्यासह आदी उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...