लोणी येथे मटका अड्ड्यावर धाड

.
आर्णी पोलिसांची कारवाई. जवळा . आर्णी पोलीस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या लोणी गावात अवैद्य रित्या मटका चालू असल्याच्या गोपनीय माहितीवरून आर्णी पोलिसांनी धाड टाकली असता एक व्यक्ती लोणी येथील शिवाजी चौक येथे सार्वजनिक ठिकाणी हातात मटका पट्टी घेऊन व १ ते १० अंक लिहून लोकांना पट्ट्या देताना व त्यांच्याकडून पैसे घेताना सापडला
त्याची पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्याजवळ वरली मटका साहित्य व नगदी 880 रुपये मिळून आले त्याला अधिक विचारनी केली असता तो अवैध्य व्यवसाय त्याचा नसून महागाव येथील नाना केळतकर यांचा असल्याची कबुली दिली यावरून आरोपी संजय गुडे वय 38 राहणार लोणी व नाना केळतकर वय 62 राहणार महागाव या दोघांवर महाराष्ट्र मटका जुगार बंदी कायद्यांतर्गत गुन्हे दाखल करण्यात आले
ही कारवाई आणि पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गणपत काळुसे पोलीस कॉन्स्टेबल रवींद्र चव्हाण यांनी केली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...