ग्रामपंचायत जवळा येथे ध्वज वितरण केंद्र.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे मार्गदर्शन .
जवळा
तालुक्यातील जवळा येथे आझादिका अमृत महोत्सव 13 ऑगस्ट ते 15 आगष्ट पर्यंत आयोजित हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत ग्रामपंचायत कार्यालयामध्ये 11 तारखेला ध्वज वितरण केंद्र सुरू करण्यात आले यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ध्वज वितरणा बाबद आढावा घेतला व तालुक्यातील सर्वात मोठे गाव असल्याने 2 दिवसात संपूर्ण जवळा गावात ध्वज वितरण करण्याचे आदेश ग्रामसेवक,सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांना दिले व तसेच आजपर्यंत किती घरापर्यंत तिरंगा ध्वज पोहचविले याचा आढावा घेतला व तिरंगा ध्वज आपल्या राष्ट्राचा गौरव असल्याने तो व्यवस्थित आपल्या घरावर लावावा असे मार्गदर्शन केले यावेळी तहसिलदार परशराम भोसले,गटविकास अधिकारी जयश्री वाघमारे,तलाठी देवधर,ग्रामसेवक राजपाल गुजर, कृषीसेवक गायकी साहेब,सरपंच प्रणिता आडे, उपसरपंच बाबाराव खोडणकर,सर्व ग्रामपंचायत सदस्य व गावकरी मंडळी उपस्थित होते.
ग्रामपंचायत जवळा येथे ध्वज वितरण केंद्राला जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिली भेट
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा