संवेदनशील जिल्हाधिकारी !वृद्धाश्रमात रक्षाबंधन.

आर्णी तालुक्यातील उमरी पठार येथील संत दोला महाराज वृद्धाश्रमात यवतमाळचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी रक्षाबंधन सण साजरा केला. जिल्हाधिकारी अमोल येडगे संवेदनशील अधिकारी म्हणून परिचित आहे. सामाजिक उपक्रमांमध्ये सदैव सहभागी होतात. बहीण भावाचा पवित्र सण असलेल्या रक्षाबंधनच्या शुभपर्वावर जिल्हाधिकारी अमोल येडगे हे उमरी येथील वृद्धाश्रमात पोहचले.
त्यांना पाहून वृद्ध मंडळी हरखून गेली. ज्येष्ठ वृद्ध महिला भगिनींनी त्यांना ओवाळत राखी बांधली. यावेळी जिल्हाधिकारी भारावून गेले . वृद्धांशी संवाद साधला. सुख दुखाशी समरस झाले. दरम्यान त्यांनी वृद्धाश्रम परिसरात वृक्षारोपण केले. त्याग समर्पण भावनेतून सेवा करणाऱ्या सेवाव्रती शेषराव डोंगरे यांचे कौतुक केले.
विशेष म्हणजे सध्या वृद्धाश्रमाला २५ वृद्धांची मान्यता आहे, मात्र वास्तव्यास १३५ वृद्ध मंडळी आहे. या संदर्भात मंत्रालय स्तरावर पाठपुरावा सुरू असल्याची सविस्तर माहिती त्यांनी दिली. यावेळी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष सुरेश राठी व सामाजिक क्षेत्रातील मंडळी उपस्थित होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...