वसुली करून परत येत असलेल्या महागाव येथील किराणा व्यापाऱ्यावर खडका फ्लाय ओव्हर वर प्राण घातक हमला. अनिल गंभीरमल शर्मा असे जखमी व्यापाऱ्याचे नाव आहे. अनिल शर्मा किराणा मालाच्या रकमेची वसुली करण्यासाठी वाईबाजार येथे दुचाकीने गेले होते. परंतु येताना खडका फ्लायओव्हर वर अज्ञात लुटारूंनी पाळत ठेवून त्यांची मोटरसायकल अडवली व हातावर आणि शरीरावर चाकूचे गंभीर वार करून रकमेची बॅग जबरदस्तीने पळविली.दि.17/08/2022 बुधवारी ४ वाजताच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. रोड रॉबरीच्या या घटनेत व्यापारी अनिल शर्मा हे गंभीर जखमी असून त्यांना उपचारासाठी तातडीने पुसद येथे भरती करण्यात आले आहे. बॅगमध्ये वसुलीची लाखो रुपये रक्कम असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनास्थळावर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले असून अनिल शर्मा यांची मोटर सायकल व चपला अस्ताव्यस्त पडून आहेत या घटनेची तालुक्यात चर्चा होत आहे.
महागाव ता. येथील किराणा व्यापाऱ्यावर प्राणघातक हमला
Bhagirath Raja 24 News.com
0



टिप्पणी पोस्ट करा