जवळा परिसरात तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा

जवळा येथे बंजारा समाजात महत्त्वाचा असणारा तिज उत्सव साजरा करण्यात आला.श्रावण महिना बंजारा समाजातील तरुणींसाठी आनंदाचे पर्व घेऊन येतो जल जंगल जमिनीचा स्वामी असलेल्या बंजारा समाजाने
अनाधिकालापासून तिजोत्सवाची पारंपरिक प्रथा जोपासली आहे. रानावनातून वारुळाची माती आणून त्यात गहू टाकून त्याला सतत नऊ दिवस पाणी टाकून अंकुरित झालेले तेजा दिनांक 20 ऑगस्ट 2022 रोजी बंजारा समाजाने वाद्याच्या गजरात पारंपारिक नृत्य करून मोठ्या उत्साहात साजरा करताना तरुणींच्या चेहऱ्यावरील आनंद वाहत होता.
यानंतर तीज पाण्यामध्ये विसर्जित करण्यात आला यावेळी बंजारा बांधव मोठ्या संख्येने एकत्र आले होते. तीज उत्सव हा यशस्वी करण्यासाठी ग्रामपंचायत सदस्य आशिष राठोड यांनी व त्यांच्या समाजातील तरुण व तरुणीच्या सहकार्याने मेहनत घेतली.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...