हर हर महादेव च्या जय घोषणे आर्णी शहरात निघाली भव्य कावड यात्रा

आर्णी शहरात प्रथमतः श्रावण मासा निमित्त शेवटच्या सोमवारी भव्य कावड यात्रेचे आयोजन विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, कावड यत्रा उत्सव समितिने केले. श्रावण माणसाच्या शेवटच्या सोमवारी आर्णी ची जिवनदाइनी पवित्र अशी अरुणावती नदी तुन शिवभक्तांनी कावड यात्रे साठी कलशा मध्ये पवित्र जल भरुन हि यात्रा शहरातिल शनिमंदिर, विठ्ठल मंदिर, गणपती मंदिर, बाकीपुरी मठ प्रगट हनूमान मंदिर, सराफा बाजार, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यापासून मेनरोड शिवाजी चौक रामराज्य चौक, हनूमान मंदिर शिवनेरी चौक देउरवाडा पुनवर्सन करित
मनपुर येथील मार्कण्डेय ऋषी मंदिर वरून आर्णी येथिल प्राचिन हेमाडपंथी असलेला जागृत असे शिवालय सिद्धेश्वर महादेव मंदिर येथे पोहोचली. या कावड यात्रेत मोठ्या प्रमाणात युवक युवती सह शिवभक्त मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून प्रत्येक मंदिरात पवित्र जल अर्पित करुन पुजा अर्चना करण्यात आली. कावड यात्रेचे मुख्य आकर्षण राहिले ती नंदिची 15 फुटाची मुर्ती. या कावड यात्रेत भगवान शंकराची प्रतिमा ट्रैक्टर वर सजवली होती. शहरात ही यावर्षी पासुन पहिल्यांदाच कावड यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत शामिल शिवभक्तांच्या हर हर महादेव जय शंभु भोला भंडारी आदी गजराने आसमंत निनादला होते. कावड यात्रेचे समारोप सिद्धेश्वर महादेव मंदिरात जल अर्पण करुन महा आरती करून करण्यात आला. यावेळी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. यात्रेचे जागोजागी स्वागत करुन पुष्प वर्षा करण्यात आली.
या यात्रे च्या सफलते साठी विश्व हिंदू परिषद, बजरंगदल, कावड यात्रा उत्सव समिती, दुर्गा वाहिनी, मातृशक्ति च्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्तांनी सह शिवभक्तांनी अथक प्रयत्न केले. व आर्णी तील सर्व नागरिकांनी जगो जागी पाणी शरबत चहा फळ वाटप केले त्या बद्दल सर्वांचे आभार व असेच सहकार्य आम्हला प्रत्येवेळी लाभो ही विनंती व पुनच्छा सर्वांचे आभार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...