कपाशीवर रसशोषन किडींचा प्रादुर्भाव

आर्णी तालुक्यात कधी ऊन तर कधी ढगाळी वातावरण राहून पाऊस पडत असल्याने कपाशीच्या पिकांवर रसशोषन किडींचा प्रादुर्भाव जाणवु लागला आहे.
पावसाने थोडी उघाड दिल्याने शेतकऱ्यांच्या शेतातील डवरण, निंदन, फवारणी, खत देणे हे कामे चालु आहे. ढगाळी वातावरण राहत असल्याने हे वातावरण रोगाला पोषक असल्याने कपाशीच्या पिकांवर रसशोषन किडीचा प्रादुर्भाव झाल्याचे शेतकऱ्यांना दिसत असल्याने तो रोखण्यासाठी शेतकरी महागडे किड नाशक औषध घेऊन शेतातील कपाशीच्या पिकांवर शेतकरी फवारणी करीत आहे.
त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहे शेतकऱ्यांच्या शेतातील कपाशीच्या पिकांचे पाने कोकळी पडत आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्याच्या शेतावर जाऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे. अशी मागणी शेतकऱ्यांकडुन केली आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...